सांगोला भूमी अभिलेख कार्यालयातून अनाधिकृतपणे केलेल्या क्षेत्रवाढ प्रकरणात अद्यापर्यंत गुन्हा दाखल न
झाल्याने मोहसीन मुलाणी यांचे 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
सांगोला/प्रतिनिधीः सांगोला भूमी अभिलेख कार्यालयामधील अनागोंदी कारभार वारंवार चव्हाट्यावर येत असताना काही दिवसापूर्वी या कार्यालयामधून बेकायदेशीरपणे मिळकत प्रत्रिकेमध्ये चक्क अक्षरी व अंकी क्षेत्रवाढ करण्यात आली होती.
नागरीकांच्या मिळकती या कार्यालयात जपून ठेवण्याचे काम होत असताना मात्र या मिळकत पत्रिकेमध्ये अशा प्रकारे त्या पत्रिकेमध्ये अनाधिकृतपणे चुकीच्या पध्दतीने चक्क मूळ पत्रिकाच बदलून त्या पत्रिकेमध्ये आपल्या मनमर्जीप्रमाणे पाहिजे तशी क्षेत्रवाढ करून घेतली.
ही बाब येथील अधिकार्यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्यानंतर व तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर येथील अधिकारी यांनी या कार्यालयामधूनच खाडाखोड झालेली आहे असे मान्य देखील केले आहे. त्यानंतर ती चुकीची खाडाखोड पहिल्याप्रमाणे मूळ पत्रिकेप्रमाणे करण्याचे आदेशदेखील करण्यात आले.
त्यानंतर ही मूळ पत्रिका पहिल्याप्रमाणे झाली मात्र हे सर्व कटकारस्थान कोणी व का केले? हे मात्र अद्यापर्यंत गुलदस्त्यातच आहे. तक्रारदार यांनी या प्रकरणामागे कोण आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे वारंवार तक्रारी अर्ज केले.
असताना मात्र येथील अधिकारी हे मात्र वेळकाढूपणा करीत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे तक्रारदार मोहसीन मुलाणी हे सांगोला भूमी अभिलेख कार्यालय यांच्या विरोधात येणार्या 26 जानेवारी रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण करणार असल्याचे सांगितले.


0 Comments