सांगोला वाळू भरताना जेसीबीसह दोन ट्रॅक्टर ट्रॉल्यांसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगोला ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करताना पोलिसांनी छापा टाकून बैलवण नदी पात्रातून चोरून वाळू उपसा करून ट्रैक्टर ट्रॉलीत भरताना १ ब्रास वाळूसह जेसीबी, दोन ट्रैक्टर ट्रॉल्या असा २५ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास नाझरे रोड पुलाच्या डाव्या बाजूस बेलवण नदी पात्रात केली. याबाबत पोलिस नाईक विजय थिटे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी जेसीबी चालक महादेव गोरख दुधावले (रा. नाझरे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या आदेशान्वये सहायकपोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर,
रात्री ११ वाजता ग्रामपंचायत
पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास बनसोडे, अनिल बनसोडे, पोलिस नाईक विजय विटे, प्रकाश कोष्टी हे १६ डिसेंबर रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. त्यांना गोपनीय बातमीच्या आधारे नाझरे गावाच्या हद्दीत बेलवण नदी पात्रात नाझरे ते नाझरा मठ रोड पुलाच्या डाव्या बाजूस नदीतून काही इसम जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करून ट्रैक्टर ट्रॉलीत भरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिस तेथे गेले असता, जेसीबीसह दोन ट्रैक्टर उभे दिसल्याने पोलिसांना संशय आला. यावेळी पोलिस वाहनाकडे येताना पाहून दोनट्रैक्टर चालक अंधाराचा फायदा घेऊन नदीपात्राच्या शेजारी झुडपात पळून गेले. जेसीबी चालक पळून जात असताना सरकारी वाहनाच्या उजेडात पाहिले असता, महादेव गोरख बुधावले असल्याचे ओळखले. तोसुद्धा झुडपात पळून गेला
पोलिसांना दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांमध्ये प्रत्येकी अर्धा तास वाळू भरलेली दिसून आली. पोलिसांनी १४ लाखांचा एमएच ०९ / ईयू ०५६३ क्रमांकाचा जेसीबी, १० लाख ८० हजारांचे एमएच ४५ एडी ७२०१ व एमएच ३७ / एल ४७९० या दोन ट्रैक्टरसह विनानंबरच्या ट्रॉल्या असा २५ लाख ८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला.
0 Comments