google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शिवणे परिसरात निसार काझी वैभव कोळेकर , शशिकांत जानकर मित्र परिवाराने वाचवले जखमी कोल्ह्याचे प्राण

Breaking News

सांगोला शिवणे परिसरात निसार काझी वैभव कोळेकर , शशिकांत जानकर मित्र परिवाराने वाचवले जखमी कोल्ह्याचे प्राण

सांगोला शिवणे परिसरात निसार काझी वैभव कोळेकर , शशिकांत जानकर मित्र परिवाराने वाचवले जखमी कोल्ह्याचे प्राण

       आज सकाळी शिवणे परिसरातील एखतपुर शिव रास्त्या जवळील खडी क्रेशर समोर एक कोल्हा जखमी अवस्थेत दिसला.

 याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते निसार काझी यांनी घटनास्थळाला तात्काळ भेट देवून त्या जखमी कोल्ह्याला मलमपट्टी करून प्रथमोपचार केले. सदर माहिती वनविभाग सांगोला यांना कळवून वन अधिकाऱ्यांच्या हाती सुरक्षित सुपूर्द केले. 

मुक्या प्राण्याप्रती जागरूकता दाखवून त्याचे प्राण वाचवण्यासाठी  सामाजिक कार्यकर्ते निसार काझी , वैभव कोळेकर , शशिकांत जानकर या तरुणांनी परिश्रम घेतले. निसार काझी आणि त्यांचा मित्र परिवार नेहमीच सामाजिक प्रश्न सोडवण्यात अग्रेसर असतात.त्यांच्या अतुलनीय सामाजिक कार्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments