सांगोल्यात शहाजीबापू व दिपकआबा गटाला चार गावात तर
शेकापला दोन गावात सरपंचपद बहुचर्चित शिवणे आणि बलवडीमधे सत्तांतर...!
सांगोला : तालुका प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील ६ ग्राम पंचायतची निवडणूक पार पडली. या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत.
यामध्ये ६ पैकी तब्बल ४ ग्राम पंचायतवर आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. तर प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्षाला केवळ दोन ग्रामपंचायतवर समाधान मानावे लागले आहे.
अत्यंत अटीतटीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवणे आणि बलवडी येथील शेतकरी कामगार पक्षाची सत्ता उलथवून टाकण्यात बापू आबा गटाला यश मिळाले आहे. सांगोला तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दादासाहेब घाडगे यांनी निर्विवाद यश मिळवत ११ पैकी ७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले.
सांगोला तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती. यामध्ये पाचेगाव खुर्द या गावातील निवडणूक या अगोदरच बिनविरोध करण्यात यश आले होते, तर राहिलेल्या पाच ग्रामपंचायतीचे निकाल आज लागले. यामध्ये अनकढाळ व चिंचोली गावात शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहेत.
बलवडी, चिणके, शिवणे, पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीवर आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील गटाने वर्चस्व मिळवले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या शिवणे ग्रामपंचायतवर आजी - माजी आमदाराच्या गटाने वर्चस्व मिळविण्यात यश मिळवले आहे.
शिवणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दादासो जनार्दन घाडगे यांनी १६४५ मते मिळवून विरोधी उमेदवार मारुती जगन्नाथ घोगरे (१३०८) यांचा ३३७ मतांनी पराभव केला. विजयी उमेदवार संजय वलेकर ५१३, रंपाबाई ऐवळे ४४१, सुनिता ईरकर ५३८, नामदेव जानकर ४८७, उदयसिंह घाडगे ५१७, छाया घाडगे ५७९, अंबादास भाटेकर ३७८, सुनिता घाडगे ३७२, कशिलिंग शेळके ३८८, प्रियांका शेळके ३८२, कुसुम घाडगे ४११ मतांनी विजयी झाले आहेत.
चिणके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नाथा दत्तू खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली. तर सदस्यपदी जालिंदर मिसाळ १८७, दिपाली काटे २५५, भीमराव मिसाळ ३४३, दिपाली मिसाळ ३७०, तानाजी कवठेकर ४७४, मोहन मिसाळ ३३३, शांताबाई मिसाळ ४१३, विनायक मिसाळ ३३२, विमल मिसाळ ३७६, तेजस्विनी मिसाळ ३५२, सविता शितोळे ३७९ विजयी झाले आहेत.
अनकढाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली दऱ्याबा बंडगर यांनी ८२४ मते मिळवून विरोधी उमेदवार वर्षा बंडगर (४००) यांचा ४२४ मतांनी पराभव केला. या ठिकाणी शारदा काटे, सुनील अडसूळ, मयुरी अदाटे हे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर सदस्यपदी पांडुरंग पवार ३६५, दिगंबर बंडगर ३८०, शुभांगी बंडगर ३४९, अर्चना उर्फ अंजना बंडगर ३५७, नामदेव बंडगर ३३२, विमल बंडगर ३५६ हे निवडून आले आहेत.
चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रय बेहरे यांनी ९६४ मते मिळवून विरोधी उमेदवार लक्ष्मण बेहरे यांचा १५३ मतांनी पराभव केला.
तर सदस्यपदी अविनाश सुर्यागण १८१, कलावती गडदे १७४, बाळासो चव्हाण २३७, पमाबाई बेहरे २४४, स्वाती इंगळे २४६, अंकुश खांडेकर ४०८, विठ्ठल घाडगे ४१०, जानकाबाई हजारे ३९९, रामेश्वर शिनगारे ३०१, शोभा माने ३०२, सुमन खरात २७९ हे निवडून आले आहेत.
बलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांनी ११५० मते मिळवून विरोधी उमेदवार तानाजी नामदेव सांगोलकर (९२३) यांचा २२७ मतांनी पराभव केला. तर शिवाजी शिंदे, शारदा धायगुडे, सुनिता तोरणे, समाधान शिंदे, सुरेखा पवार, बाबासाहेब पालसांडे, कृष्णदेव कारंडे, राधाबाई राऊत, नंदा करडे, रविराज शिंदे, मनिषा गुरव यांनी बिनविरोध निवड झाली आहे.
पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता संजय भोसले यांची बिनविरोध निवड झाली. तर सदस्यपदी शिवाजी मिसाळ, रंजना मिसाळ, अर्चना मिसाळ, हणमंत मिसाळ, सविता यादव, युवराज भंडगे, दिपाली नलवडे, भारत मिसाळ, इंदुमती काबुगडे यांची बिनविरोध निवड झाली.
0 Comments