सांगोला अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिक दुकानाचे शटर उचकटून १ लाख ८० हजाराची चोरी
सांगोला प्रतिनिधी अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिक 1. स्पेअर पार्टच्या दुकानाचे शटर्स उचकटून इलेक्ट्रिक मोटारीचे नवीन व स्क्रॅप साहित्याचे एक लाख ८० हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना महुद बुद्रुक (ता. सांगोला) येथे १९ डिसेंबर रात्री साडेआठ ते २० डिसेंबर सकाळी साडेआठच्या ■ दरम्यान घडली आहे.
फिर्यादी गोरखनाथ महादेव अनपट (रा. महुद बुद्रुक ता. - सांगोला) यांचे आटपाडी ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवर महुद बुद्रुक येथे प्रकाश इंटरप्राईजेस अँड इंजीनियरिंग वर्क्स नावाचे स्पेअर पार्टचे दुकान आहे.
१९ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ते आपले दुकान बंद करून घरी गेले होते. २० डिसेंबर रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास फिर्यादीने दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर्स उचकटून अर्धवट उघडलेले दिसले.
दुकानात जाऊन पाहिले असता दुकानातील लाकडी रँकमध्ये ठेवलेले इलेक्ट्रिक मोटारीचे नवीन व स्क्रॅप असे एक लाख ८० हजार रुपयेचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद गोरखनाथ अनपट यांनी अज्ञात चोरट्या विरोधात दिली आहे.
0 Comments