सांगोला तालुक्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाची अवैध दारू विक्रीवर कारवाई
सांगोला (प्रतिनिधी) उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने अवैध दारू विक्रीवर केलेल्या कारवाईत 20 हजार 652 रुपये किमतीचा देशी विदेशी दारू बाटल्या जप्त करून एकाच ताब्यात घेतले
असल्याची घटना शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी दु. साडेचार च्या सुमारास वाकी शिवणे ता. सांगोला येथील हॉटेल अजिंक्यतारा येथे घडली आहे. उपविभागीय अधिकारी राजश्रीपाटील यांचे मार्गदर्शनाखाली
अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी सपोफौ तोडले, पोकॉ. सुनिल मोरे व मिसाळ असे मिळुन खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत मौजे - वाकी शिवणे ता. सांगोला गावातील मिळाली कि, एक इसम नामे किरण डांगे हा त्याचे कामगारा कडून हाँटेल अजिंक्यतारा हाँटेल अजिंक्यतारा शेजारी आलो असता तेथे
बातमीदारामार्फत बातमी शेजारी आडोशाला चोरून देशीदारूची विक्री करीत आहे, अशी बातमी मिळाल्याने पोलिस नमुद ठिकाणी गेले असता,
हाँटेल अजिंक्यतारा शेजारी एक इसम आपले समोर एक पांढरे रंगाची पिशवी घेवुन बसलेला दिसला त्याचा आम्हास बातमीप्रमाणे प्रोव्हीशन गुन्हाचे कामी संशय आलेने त्यास पोलिसांनी गराडा घालुन जागीच पकडले असता त्याने त्याचे नाव रमेश रंगनाथ जाधव वय - 30 वर्षे रा फुलकळस जि.परभणीसध्या रा. वाकी शिवणे ता.सांगोला असे असल्याचे सांगीतले.
त्याचे कब्जातील पांढरे रंगाची पिशवी पंचासमक्ष तपासून पाहता त्यामध्ये मिळुन आलेल्या प्रोव्ही. मालाचे वर्णन खालीलप्रमाणे.
1400रु डीएसपी ब्लॅक 10 सीलबंद बाटल्या, 1430 - रुच्या डॉक्टर बॅन्डी 13 बाटल्या / 2400 - रुच्या. रुच्या . मँगडॉल व्हीस्की 15 बाटल्या, 1620 रुच्या रॉयल स्टँग व्हीस्की 9 बाटल्या, 3000 रुच्या945-रू ऑफीसर चाँइस 7 बाटल्या, 900 - रु गोवा जिन 9 बाटल्या, 1485- रु.
मँगडॉल नं - 1 रम 11 बाटल्या, 2660 रु. देशी दारू संत्रा 38 बाटल्या,1280 - रु रोमँनो ओडका 8 बाटल्या, 2660 – रु देशी दारू टॅगो 38 बाटल्या, 872 / - रु ग्रंडमास्टार ओडका 4 बाटल्या असा सुमारे 20 हजार 652 रुपये किंमतीचा प्रोव्हीशन माल मिळुन आला सदर माल पोलिसांनी जप्तकेला आहे
याबाबत पोकॉ सुनील मोरे यांच्या फिर्यादीनुसार रमेश रंगनाथ जाधव 30 वर्षे रा. फुलकळस जि. परभणी सध्या रा. वाकी शिवणे व हॉटेल मालक किरण बाळासाहेब डांगे 40 वर्षे रा. तिसंगी ता. पंढरपुर या दोंघा इसमा विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.
0 Comments