google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर असणार हा नेता ; शिवसेनेची तोफ या दिवशी सोलापुरी

Breaking News

सोलापुरात सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर असणार हा नेता ; शिवसेनेची तोफ या दिवशी सोलापुरी

 सोलापुरात सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर असणार हा नेता ; शिवसेनेची तोफ या दिवशी सोलापुरी

सोलापूर -महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये१५ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हुतात्माच्या स्टेजवर प्रथमताच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. 

या कार्यक्रमास आ. भास्कर जाधव, शिवसेना उपनेते व सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, महिला आघाडी संपर्कप्रमुख संजना घाडी यांची उपस्थिती राहणार आहेत . यापूर्वी अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेअंतर्गत अनेक सडेतोड व प्रभावी भाषणे झाली आहेत. यांच्या भाषणाला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 

या सभेला सर्व उपजिल्हाप्रमुख,युवा सेना, विद्यार्थी सेना, रिक्षा सेना, महिला आघाडी, वाहतुक सेना, सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, कामगार सेना आणि शिवसेना प्रणित सर्व संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या शिवसैनिकासह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन 

 जिल्हाप्रमुख बरडे व शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी केले आहे. दरम्यान या सभेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे सुषमा अंधारे यांच्या निशान्यावर असणार अशी चर्चा आतापासून सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments