google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील घटना... प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक झाला फेल आणि ----

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील घटना... प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक झाला फेल आणि ----

सोलापूर जिल्ह्यातील घटना... प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक झाला फेल आणि ---- 

प्रवासी घेवून निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या ब्रेक फेल झाला परंतु चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. प्रवासी आणि नागरीकातून चालक दिगंबर शिंदे यांना धन्यवाद दिले जात आहेत. 

अलीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे देखील अपघात वाढू लागले आहेत आणि यामुळे प्रवाशांचे प्राण संकटात येताना दिसत आहेत. सुरक्षित प्रवास म्हटल्या जाणाऱ्या या बसचेही अपघात होत आहेत परंतु सोलापूर आगारातील एका बसचा मोठा अपघात होता होता टळला आहे. 

धावत्या वाहनाचे ब्रेकच निकामी झाल्यावर चालकाच्या हातून वाहनांचे नियंत्रण सुटत असते आणि अपघात होण्याचीच अधिक शक्यता असते. जवळपास ७० ते ८० प्रवासी घेवून जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाला आणि समोर मोठे संकट दिसताच बसचालकाने प्रसंगावधान राखले. 

आपली बस नियंत्रणात नसल्यामुळे त्याने समोरच्या वाहनाला धडक देण्याऐवजी बस सरळ रस्त्याकडेच्या शेतात घातली आणि बसवर नियंत्रण मिळवले त्यामुळे मोठा अनर्थ टाळला गेला आणि प्रवाशांचे प्राण देखील वाचले आहेत.

सोलापूर आगाराची  वैराग - मोहोळ ही बस (एम एच ०६ / ८३३९)  धाईंजेवाडीपासून तीन किमी अंतरावर ही थरारक घटना घडली. जगदंबा हॉटेलच्या समोर येताच धावत्या बसचे ब्रेक फेल झाले आणि हा प्रकार चालक दिगंबर शिंदे यांच्या लक्षात आला.

 बसमध्ये सत्तर ते ऐंशी प्रवासी प्रवास करीत होते त्यामुळे त्यांचे प्राण वाचवणे हे चालकापुढील आव्हान होते. त्यातच समोरून एक ट्रॅक्टर येत होता. ब्रेक न लागण्यामुळे समोरच्या ट्रॅक्टरला बस धडकण्याचीच अधिक शक्यता दिसत होती. 

ही धडाक चुकवून अपघात टाळण्यासाठी चालक शिंदे यांनी क्षणाचाही विचार न करता प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या खाली घेतली आणि शेजारच्या शिवारात बस नेली. ही बस शेतात गेल्यामुळे तिचा वेग मंदावला आणि बसवर नियंत्रण मिळवता आले. 

बस धावत असताना समोरून उसाचा ट्रॅक्टर आलेला होता आणि  सदर बस रस्त्याच्या उताराला लागलेली होती. हा प्रसंग अत्यंत थरारक होता. 

उतारावरून बस धावत होती आणि समोरून उसाचा ट्रॅक्टर आल्याने चालकाने बसचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला तेंव्हा बसचे ब्रेक निकामी झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्क्षणी त्यांनी आपली बस रस्त्याच्या बाजूच्या शेतात घुसवली.

 शेतात गेल्यावर ही बस शेताच्या बांधावर जाऊन धडकली आणि थांबली. त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला. अशी थरारक घटना घडली असली तरी बसमधील एकही प्रवासी जखमी झाला नाही. 

या थरारक प्रसंगावेळी बसमधील प्रवाशी मात्र घाबरून गेले होते. एकादशीच दिवस असल्यामुळे बसमध्ये मोठी गर्दी होती आणि या बसमधून अनेक भाविक पंढरपूरकडे निघालेले होते.  केवळ बसचालक दिगंबर शिंदे यांच्याच प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला त्यामुळे प्रवाशातून त्यांना धन्यवाद दिले जात असून स्थानिकांनी चालक शिंदे यांचा सत्कार करून त्यांचे ऋण व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments