google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरकरांनो, लक्ष द्या ! तुमची मतदारयादी अपडेट करायची आहे का ? भारत निवडणूक आयोगाने दिली 2 दिवसाची संधी

Breaking News

सोलापूरकरांनो, लक्ष द्या ! तुमची मतदारयादी अपडेट करायची आहे का ? भारत निवडणूक आयोगाने दिली 2 दिवसाची संधी

 सोलापूरकरांनो, लक्ष द्या ! तुमची मतदारयादी अपडेट करायची आहे का ? भारत निवडणूक आयोगाने दिली 2 दिवसाची संधी

भारत निवडणूक आयोग यांचेकडून प्रत्येक वर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घेवून अस्तित्वात असेलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करून त्रुटी विरहित करण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि ०१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनाकांवर छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

त्या अनुषंगाने दि ०३  डिसेंबर (शनिवार) व ४ डिसेंबर (रविवार), २०२२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातर्गत विशेष मोहिमेचे आयोजन केलेले आहे. 

१. सदर विशेष मोहिमेमध्ये अस्तिवात असेलेली मतदार यादी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी/ तपासण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आलेली असून तरी, नागरिकांनी मतदार यादीमध्ये नोंदी तपासून घ्याव्यात.

२. मतदार यादीमध्ये नोंदणी झालेल्या मतदारांच्या नोंदणीचे प्रमाणीकरण करणेची कार्यवाही सुरु असल्याने मतदारांनी त्यांचा आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी संलग्न करणेकामी त्याचे आधार क्रमांक संबंधित BLO यांचेकडे द्यावेत.

३. मतदार यादीमधील नोंदणीबाबत हरकती, नोंदीमध्ये दुरुस्ती व नवीन नाव नोंदणी करावयाची  सुविधा मोहिमेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर मोहिमेमध्ये मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी. लग्न होवून बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी, 

लग्न होवून आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, PWD (दिव्यांग) मतदार चिन्हांकीत करणे तसेच दि ०१.०१.२०२३ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहेत त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी, तसेच ज्यांचे दि ०१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत १८ पूर्ण होणार आहेत.त्याचेकडून नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. 

तरी, दि ०३  डिसेंबर (शनिवार) व ४ डिसेंबर (रविवार), २०२२ रोजीच्या विशेष मोहिमेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदविणेबाबत मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,सोलापूर व भारत वाघमारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांचेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments