google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता आठवीपर्यंतची ढकलपास पद्धत बंद होणार?

Breaking News

आता आठवीपर्यंतची ढकलपास पद्धत बंद होणार?

 आता आठवीपर्यंतची    ढकलपास पद्धत बंद होणार?

मुंबई (प्रतिनिधी) – प्राथमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थी आणि पालकांसाठी आताच्या घडीला सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा होणार असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.त्यामुळे आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणारे धोरण बंद होण्याची शक्यता आहे. पण याबाबत अजून पूर्ण स्पष्टता आलेली नाही.

शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत पास केलं जात आहे. पण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अनेक विद्यार्थी आठवी पास झाले तरी त्यांना लेखन आणि वाचकहो करता येत नाही. त्यामुळे नववीला नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञांबरोबर चर्चा करुन शिक्षण हक्क कायद्यात काही बदल केले जाऊ शकतात का?

 याविषयी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर चर्चा करत आहेत. त्यानुसार तिसरीपासून परीक्षा घेण्याचे संकेत केसरकर यांनी दिले आहेत.हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतीम निर्णय घेतला जाईल असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या आठवीपर्यंत सर्वांना पास केले जाते. त्यामुळे अनेकजण अभ्यास करत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी ‘ढ’ राहतात. तसेच अनेकजण नववीत नापास होतात. तसेच शाळा सोडून जाण्याचेही प्रमाण मोठे आहे. त्यामुळे तिसरीपासून परिक्षा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. अर्थात नवीन वर्षापासून हे धोरण लागू होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments