google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग ७रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग. -आमदार शहाजीबापू पाटील.

Breaking News

सांगोला तालुक्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग ७रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग. -आमदार शहाजीबापू पाटील.

 सांगोला तालुक्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग ७रस्ते  प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग. -आमदार शहाजीबापू पाटील.

सांगोला/ प्रतिनिधी ग्रामीण भागातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्ते जिल्हा परिषदेकडे असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी येतो त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शाळकरी मुले  दूध उत्पादक  यांना प्रामुख्याने दळणवळण करणारे रस्ते आहेत  हे रस्ते  जिल्हा परिषद अंतर्गत असल्याने त्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी  कमी प्रमाणात येतो.

 त्यामुळे त्याची देखभाल व दुरुस्ती करणे जिल्हा परिषद बांधकाम विभागात जिकरीचे होते परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना  नादुरुस्त रस्त्यामुळे त्रास होतो  याची दखल घेत सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी  जिल्हा परिषदेकडे असलेले.

  सांगोला तालुक्यातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दर्जोन्नत होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे  मागणी केल्याप्रमाणे  सांगोला तालुक्यातील ७  रस्त्यांना १२७किमी लांबीचे रस्ते  सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दर्जोन्नत झाले असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

 सदरच्या रस्त्यांना  आत्ता  महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून  थेट निधी येणार असल्याने सदरचे रस्ते हे  वाहतुकीसाठी भविष्यकाळामध्ये सुसज्ज होणार असल्याने  नागरिकांना सोयीचे होणार आहे

 या मधून सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी ते बलवडी ते माडगूळ जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता एकूण लांबी  १२.००किमी

 मांजरी देवकते वाडी हलदहिवडी गायगव्हाण ते रामा १४३ ला जोडणारा रस्ता एकूण लांबी  ३०किमी.महूद बुद्रुक पवारवाडी नरळेवाडी ती वाकी शिवणे रामा १२५ ला जोडणारा रस्ता एकूण लांबी १३.५०० किमी.सांगोला ते आलेगाव रस्ता एकूण लांबी ११ किमी.बलवडी चोपडी बंडगर वाडी सोमेवाडी इराचीवाडी 

कोळा कोंबडवाडी ते किडबिसरी एकूण लांबी ३१.५००. जिल्हा हद्द चिंद्यापीर चोपडी हातीद जुजारपूर ते प्रजिमा क्रमांक १६४ ला जोडणारा रस्ता लांबी १३ किमी.वेळापूर तांदुळवाडी ते महिम रस्ता एकूण लांबी १६ किमी  हे रस्ते  जिल्हा परिषदेकडून  महाराष्ट्र शासनाच्या  सार्वजनिक  बांधकाम विभागाकडे दर्जोन्नत झालेले आहेत.

Post a Comment

0 Comments