google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांची स्वमदत गट आणि प्रांत पोलिस मित्र परिवार यांची एकत्रितपणे भेट

Breaking News

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांची स्वमदत गट आणि प्रांत पोलिस मित्र परिवार यांची एकत्रितपणे भेट

 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांची स्वमदत गट आणि प्रांत पोलिस मित्र परिवार यांची एकत्रितपणे भेट

   पुणे:-महिलांवरील अत्याचार,अन्याय,सुरक्षा अशा महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याकरिता महाराष्ट्र महिला आयोग कार्यरत आहे.त्या अनुषंगाने नुकताच स्वमदत गट आणि प्रांत पोलिस मित्र परिवार यांची

 महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांची एकत्रितपणे पूणे येथे भेट झाली.सदर भेट ही अनौपचारिक होती.सदर भेटीदरम्यान स्वमदत आणि प्रांत पोलिस मित्र परिवार यांच्यातर्फे रुपाली ताई चाकणकर यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.

स्वमदत तर्फे एडवोकेट पियाली घोष आणि एडवोकेट अनिशा फणसळकर यांनी महिलांकरिता करत असलेल्या कार्याचा सारांश सांगितला.तसेच पुढील काळात महिलांसाठी काय कार्य करता येईल याविषयी चर्चा केली.त्यास अध्यक्ष महोदयांनी खूप जाणीवपूर्वक तसेच उत्स्फूर्तपणे स्वतःहून काही सूचना केल्या.

तसेच पुढील कार्यात गरज भासल्यास योग्य ती मदत,सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे देखील सूतोवाच केले.प्रांत पोलीस यांच्यावतीने श्री.गोपाल बिरारी,श्री.चिंचवडे यांनी माननीय अध्यक्षांशी संवाद साधला.पोलीस मित्र संघाच्या कार्याची त्यांनी माहिती दिली.तसेच पोलिसांकरता पुढील काळात मदतीची अपेक्षा केली,त्यास अध्यक्ष महोदयांनी हरप्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले.

सदर भेटीदरम्यान मा.रूपालीताई चाकणकर यांनी महिलांकरिता,महिला आयोग करत असलेल्या कामाचे तसेच पुढील काळातील काही बदलांविषयी,आयोगाच्या कामकाजा विषयी माहिती दिली.मा. अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांनी  स्वमदत गट आणि प्रांत पोलिस मित्र प्रतिनिधींस वेळ देऊन छान संवाद साधला.

Post a Comment

0 Comments