राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर सांगोला विद्यामंदिर येथील सराव शिबिरामध्ये निवड
सांगोला (प्रतिनिधी) राजस्थान ( भिलवाडा ) मध्ये दिनांक १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड येथील सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे घेण्यात आलेल्या निवड सराव शिबिर सांगता समारंभामध्ये करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं. घोंगडे, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, महेश शिंदे,एम.शेफी,प्रशांत मस्के, डॉ.गणेश सपाटे, अय्युब मण्यार, प्राचार्य भीमाशंकर पैलवान, विलास क्षिरसागर, सुनील भोरे, नरेंद्र होनराव, प्रा.डी.के.पाटील उपस्थित होते.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके ४१ वा.स्मृतीसमारोह व जन्मशताब्दी वर्ष सन २०२१-२२ निमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व महा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील
सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या मैदानावर राज्यस्तरीय कुमार कुमारी बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि.११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेत गडचिरोली ते मुंबई अशा ३० जिल्ह्यातून ३० मुलांचे व ३० मुलींचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू,नामांकित पंचही सहभागी होते.
या निवड चाचणी स्पर्धेतून कुमार गटातून मुंबई उपनगर व कुमारी गटातून पुणे हे संघ विजयी झाले व यातून राजस्थान येथील भिलवाडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या निवडीसाठी दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२ रोजी सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे सराव शिबिर घेण्यात आले. व या शिबिरातून कुमार व कुमारी गटातून अंतिम संघ निवडण्यात आला.
या निवड सराव शिबिर सांगता समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्पर्धासमन्वयक व क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डी.के. पाटील यांनी केले.
*चौकट* राजस्थान( भिलवाडा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेला संभाव्य १६ तून अंतिम निवड झालेला १२ खेळाडू संघ -
कुमार गट - देव प्रेमी - मुंबई उपनगर, विदित पूनमिया मुंबई उपनगर, मिलन कुमार मुंबई उपनगर, शिवराज पटेल पुणे, यश मेहता नागपुर,प्रभात मिश्रा रायगड,ब्रझैन लाखानी रायगड, यशवर्धन जाधव कोल्हापूर,सार्थक वाईकर कोल्हापूर ,साहिल धनवटे बीड ,संकल्प लोंढा औरंगाबाद, ज्योतिर्दित्य दिनवे सोलापूर, राखीव तन्मय कोकरे सातारा ,प्रशिक्षक जमीर सय्यद बीड, केदार सुतार कोल्हापूर ,संघ व्यवस्थापक आयुब मण्यार सांगोला,
कुमारी गट - मानसी निर्मळकर पुणे, भूमिका सर्जे पुणे, सिया खिलारे पुणे, गुंजन मंत्री नागपूर, स्वाती वानखेडे नागपूर, रिचा रवी मुंबई उपनगर ,पूर्वा भोसले कोल्हापूर ,आदिती पारगावकर कोल्हापूर, अविष्का गुरव सातारा, स्नेहा यादव रायगड, ऋतुजा नलवडे मुंबई शहर, समीक्षा पाटील कोल्हापूर ,राखीव खुशी सोळंकी मुंबई उपनगर, प्रशिक्षक राहुल शिंदे पुणे,विनय चिकाने नागपूर ,संघ व्यवस्थापक रितू सिंग पुणे.
0 Comments