अवधुत ज्वेलर्सचा नुतनीकरण शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी सोने चांदीची एवढी मोठी संख्या असणारा सांगोला तालुका एक नंबरबर आहे त्यामुळे सांगोला शहरात सोने चांदीच्या व्यवसायामध्ये मोठी स्पर्धा आहे. अवधुत ज्वेलर्सच्या माध्यमातून स्वत:च्या कर्तृत्वावर लेंडवे कुटुंबियांनी स्वत:ची एक नवीन ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.
सांगोला शहरातील महात्मा फुले चौकातील मायाक्का मंदिरासमोर अंबादास लेंडवे यांच्या अवधुत ज्वेलर्सचा नुतनीकरण शुभारंभ सोहळा दसर्याच्या शुभमुहुर्तावर बुधवार दि.5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
यावेळी मा.आ. दिपकआबा साळुखे-पाटील बोलत होते. व्यासपीठावर शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, तानाजीकाका पाटील, सुर्याजी खटकाळे उपस्थित होते.
श्री.चेतनसिंह केदार-सावंत बोलताना म्हणाले की, अवधुत ज्वेलर्समुळे सांगोला तालुक्याच्या वैभवात भर पडली आहे.
व्यवसाय करताना क्वॉलिटी आणि क्वांटिटी सांभाळणे गरजेचे बनले असून ग्राहकांना वास्तव स्वरुपाची माहिती सांगून आपली विश्वासार्हता अधिक बळकट करा, असे सांगत सोने-चांदीच्या व्यवसायामध्ये लेंडवे कुटुंबियांचा लवकरच ब्रॅन्ड तयार होईल असा विश्वास व्यक्त करुन लेंडवे कुटुबियांना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सोहळ्यास इंजि.रमेश जाधव, बाळासाहेब काटकर, संगम धांडोरे, सागर मिसाळ, राजू वाघमारे, सोमाआबा मोटे, मनोज ढोबळे, ग्रामसेवक पोपट खटकाळे, औदुंबर जरग,तानाजी खटकाळे, सचिन खटकाळे,
कृष्णदेव बाबर,मोहन खटकाळे, दत्तात्रय खटकाळे, अमोल चांडोले, उपसरपंच सुभाष फराटे, अनिल दिघे यांच्यासह सांगोला तालुका सराफ असा.चे पदाधिकारी, सदस्य, व्यापारी बांधव, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लेंडवे कुुटुबियांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन इरशाद बागवान यांनी केले.
0 Comments