"शिवाजी द बाॅस"..... सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सवात बार्शीच्या "शिवाजीला" विजेतेपद
"शिवाजी द बाॅस".....
सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सवात बार्शीच्या "शिवाजीला" विजेतेपद
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 18 व्या युवा महोत्सवामध्ये सर्वसाधारण विजेते पदाचा मान 91 गुणासह बार्शीच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने तब्बल चार वर्षानंतर पटकावला.
मंगळवेढा - प्रमोद बिनवडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 18 व्या युवा महोत्सवामध्ये सर्वसाधारण विजेते पदाचा मान 91 गुणासह बार्शीच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने तब्बल चार वर्षानंतर पटकावला. द्वितीय क्रमांक 50 गुणासह संगमेश्वर महाविद्यालयाने तर तृतीय क्रमांक 49 गुणासह शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज यांनी पटकावले.
शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांच्या पुढाकारामुळे दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव झाला.
त्याची पारितोषिक वितरण सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू व भाजप खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. राजेश गोदेवार हे होते. व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, वित्त लेखाधिकारी श्रेणिक शहा, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे
संचालक गुणवंत सरवदे, संस्थाध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, मीनाक्षी कदम, तेजस्विनी कदम, प्रियदर्शनी महाडिक, डॉ. विश्वनाथ आवाड, प्रभाकर कोळेकर, शोभा बोल्ली, भारती रेवडकर, राम पवार, अनिल साळुंके, जवाहर मोरे, दत्तात्रय घोलप, ज्ञानेश्वर शिंदे, यतिराज वाकळे उपस्थित होते.
बार्शीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाला यापूर्वी विजेत्याचा मान मंगळवेढा येथील युवा महोत्सवात 2017 मध्ये मिळाला होता. आज उत्साही व जल्लोशपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी शोभायात्रा काढण्याचे निश्चित होते. परंतु, परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शोभायात्रेवर गंडांतर आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी पडले.
मात्र, त्यांच्यातील उत्साहाने तयारी केलेल्या वेशभूषा व नागरिकांना द्यावयाच्या संदेश व त्याच्या फलकाचे महाविद्यालयाच्या प्रांगणात मिरवणूक काढून आनंद केला. जिल्हयातील 57 महाविद्यालयांनी 29 कला प्रकारामध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी एकूण महत्वाच्या पाच कला प्रकारांचे विभागीय विजेतेपद घोषित करण्यात आले.
ललितकला, वाड़.मय, नाट्य या कलाप्रकारामध्ये शिवाजी महाविद्यालय बार्शी, नृत्यकला मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग यांनी विभागीय पारितोषिक पटवकले. तर संगीत विभागामध्ये डीबीएफ दयानंद महाविद्यालय सोलापूर यांना विजेतेपद मिळाले सर्वांची
उत्सुकता लागलेल्या गोल्डन बॉय म्हणून एम. ए. च्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या सुरज काळे तर गोल्डन गर्ल म्हणून सांगोला महाविद्यालयाच्या तृप्ती बेंगलोरकर हिची निवड करण्यात आली. विजेत्या महाविद्यालय निश्चित झाल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात जल्लोषात मिरवणूक काढून विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
चौकट:-
युवा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना चांगलं व्यासपीठ कोरोना नंतर उपलब्ध झाले. मी यापूर्वी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला मला आतापर्यंत केलेल्या कष्टाला युवा महोत्सवाच्या सादरीकरणासाठी मंगळवेढ्याच्या अॅड. सुजित कदम यांनी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कलेच्या सादरीकरणामुळे गोल्डन बॉय होण्यापर्यंत संधी मिळाली.
- सुरज काळे, गोल्डन बाय, शिवाजी विद्यालय बार्शी
पहिल्याच प्रयत्नामध्ये एकांकिका, पथनाट्य, डान्स, स्किप्ट्र, या चार प्रकारात सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात गोल्डन गर्ल पुरस्कार सादर केलेल्या कलेला परीक्षकाने योग्य निर्णय देत. मला हा पुरस्कार मिळाला मी खूप खूप आनंदी आहे.
- तृप्ती बेंगलोरकर, बी.एसी.एस. तृतीय वर्ष, सांगोला महाविद्यालय सांगोला


0 Comments