google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर

Breaking News

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर

 राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर

 महाराष्ट्रा राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता आरक्षणानुसार राजकीय पक्ष निवडणूकीची आखणी करणार आहेत.सोडतीने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या असून अनेकांचा हिरमोड झाला आहे.


राज्यातील २८ जिल्हा परिषदांची मुदत संपून सहा महिन्याहुन अधिक काळ लोटला आहे, पण कोरोना, ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि सत्तांतरामुळे या निवडणुका रखडल्या आहेत. सध्या जिल्हा परिषदावर प्रशासक राज आहे.पण आता आरक्षण जाहिर झाल्याने त्या निवडणुका लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.पाहुयात कोणत्या जिल्ह्यातील अध्यक्षपद कोणासाठी आरक्षित झाले आहे.


जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

ठाणे – सर्वसाधारण

पालघर – अनुसूचित जमाती

रायगड – सर्वसाधारण

रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधूदुर्ग – सर्वसाधारण

नाशिक – सर्वसाधारण (महिला)

धुळे – सर्वसाधारण (महिला)

जळगाव – सर्वसाधारण

अहमदनगर – अनूसूचित जमाती

पुणे – सर्वसाधारण

सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली – सर्वसाधारण (महिला)

साेलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

काेल्हापूर – सर्वसाधारण (महिला)

ओैरंगाबाद – सर्वसाधारण

जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग

बीड – अनूसूचित जाती

परभणी – अनूसूचित जाती

हिंगाेली – सर्वसाधारण (महिला)

नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग

उस्मानाबाद – सर्वसाधारण (महिला)

लातूर – सर्वसाधारण (महिला)

अमरावती – सर्वसाधारण (महिला)

अकाेला – सर्वसाधारण (महिला)

वाशिम – सर्वसाधारण

बुलढाणा – सर्वसाधारण

यवतमाळ – सर्वसाधारण

नागपूर – अनूसूचित जमाती

Post a Comment

0 Comments