आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, माझ काय शिकू नका, फक्त धाडस शिका
युवकांनी माझ्याकडून काय शिकू नका, तर केलेले धाडस तर तुमी पाहिले, त्यामुळे माझ्याकडून फक्त धाडस शिका. असे आवाहन आ. शहाजीबापू पाटील यांनी केले
मंगळवेढा - सैराटमुळे आर्ची महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली, पण माझा झाडी, डोंगर, हा डायलॉग देशासह परदेशात प्रसिद्ध झाल्याचे सांगत युवकांनी माझ्याकडून काय शिकू नका, तर केलेले धाडस तर तुमी पाहिले त्यामुळे माझ्याकडून फक्त धाडस शिका. असे आवाहन आ. शहाजीबापू पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या 18 व्या युवा महोत्सवातील लोकनृत्य या कलाप्रकाराचे सादरीकरण करण्यापूर्वी आ. शहाजीबापू पाटील हे युवा महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संस्थाध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, मीनाक्षी कदम, संचालक तेजस्विनी कदम, सचिव प्रियदर्शनी महाडिक, विश्वास महाडीक, फॅबटेक समुहाचे भाऊसाहेब रूपनर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, संचालक, गुणवंत सरवदे, जकराया शुगरचे बी. बी. जाधव, लतीफ तांबोळी, मानाजीराव माने, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले कि, शिवाजी विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सवाचा मान सोलापूरला मिळाला. त्यामुळे जीवन घडवण्याचे व स्वप्न बघण्याचे हेच वय आहे. चुकीची स्वप्ने पाहिल्याने जीवनाचे अपघात होतात ध्येय गाठण्याचे हेच वय आहे.
वयाच्या 16 व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवराय तर अलेक्झांडरने जग जिंकण्याचे स्वप्न पाहिले ते 21 व्या वर्षी म्हणून आपली आई, वडील, भाऊ, बहिण, कुठे आहेत याची जाणीव ठेवा. सध्या काळात मोटवरंची गाणं कवाच सध्या निघून गेले, आधुनिकतेच्या चक्राखाली आनंद गमावून बसलो असून संस्कृती जपून ठेवण्याची गरज आहे. जगाच्या कुठल्याही देशात सापणार नाही.
अशी संस्कृती फक्त भारतात सापडते. असे सांगून काय झाडी, काय डोगार, यावर आधारित काय ते सुजित कदमचे कॉलेज, काय ते आयोजन, काय तो युवा महोत्सव ते वाक्य सांगत विद्यार्थ्यांच्याकडून टाळ्या घेतल्या. सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले. तर आभार लतीफ तांबोळी यांनी मानले.
पाऊल टाकताना ते मैदान खेळाचे असो अथवा राजकारणाचे किंवा बायकोसमोर जाण्याचे असो जर कचला तर बरा बकरा सापडला. म्हणतील मजबूत पाऊल टाका यश तुमच्या समोर आहे.
0 Comments