google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक : हबिसेवाडीजवळ काळवीटाचा मृत्यू मृत्यूचे कारण अस्पष्ट; वनविभागाने केला पंचनामा

Breaking News

धक्कादायक : हबिसेवाडीजवळ काळवीटाचा मृत्यू मृत्यूचे कारण अस्पष्ट; वनविभागाने केला पंचनामा

 धक्कादायक : हबिसेवाडीजवळ काळवीटाचा मृत्यू मृत्यूचे कारण अस्पष्ट; वनविभागाने केला पंचनामा

सांगोला तालुक्यातील पारे-हबिसेवाडी हद्दिवरील सोनार मळ्यात एका दीड वर्षाच्या नर जातीच्या काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार 1 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारच्या सुमारास घडलेली आहे.

सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्र असून, लांगडे,हरीण, काळवीट,तरस, कोल्हे,यासह अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.याच प्राण्यांसाठी वनविभागाने चांगल्या प्रकारे देखरेख ठेवली आहे.

वन्यप्रान्याचा मृत्यू अचानक होण्याची सांगोला तालुक्यातील पहिलीच घटना असून,शनिवार दुपारी दोनच्या ही घटना वन कर्मचाऱ्यांना कोणी तरी कळविली. त्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठांना ही बाब सांगितली.

येथील सोनार मल्याजवलील हांगिरगे गावाकडे जाणाऱ्या म्हैसाळ पोटकॅनॉल मध्ये पडून याचा मृत्यू झालेला आहे.यांच्या अंगावर कोठेही जखमा अगर काही खुणा नाहीत. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले नाही. त्यानंतर साडे तीन वाजनेच्या सुमारास वनपाल वाघमोडे, वनरक्षक राजकुमार कवठाळे यांनी भेट देवून, पंचनामा केला.

नर जातीच्या काळवीटाचा अचानक मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. खरे तर डिकसळ,पारे,घेरडी , हंगीरगे, हबिसेवाडी आधी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.येथे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत. शनिवार दुपारी दोन वाजणेच्या सुमारास काळवीटाचा मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे.वनपाल आणि वनरक्षक यांनी सदरच्या काळवीटाचे शवविच्छेदन सांगोला येथे करण्यासाठी नेले आहे. मृत्यू झालेल्या काळवीटाचे पोट मोठ्या प्रमाणात फुगले होते.त्यामुळे हे अगोदरच दोन तीन दिवस पडले असावे,असा अंदाज त्याठिकाणी उपस्थित असलेले वर्तवित होते.

Post a Comment

0 Comments