धक्कादायक! एका उंदरामुळे गेला मुलीचा जीव,ती झोप सिद्धीची शेवटची झोप ठरली
धक्कादायक! एका उंदरामुळे गेला मुलीचा जीव,ती झोप सिद्धीची शेवटची झोप ठरली
सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेली घटना मन हेलावणारी आहे. यात गाढ झोपेत असलेल्या मुलीला याची कल्पनाही नव्हती की पुढच्याच क्षणी तिच्यासोबत काय घडणार आहे.ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे येथून समोर आली आहे.
घटनेत सर्पदंशाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात एका उंदराचा पाठलाग करत साप घरात शिरला होता. यानंतर घरात शिरलेल्या सापाने झोपेत असलेल्या सिद्धी चव्हाण हिला 3 वेळा दंश केला.
ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर सिद्धी चव्हाणला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाला होता.. त्यामुळे सिद्धी चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दुपारची झोप घेत असलेल्या या मुलीला याची कल्पनाही नव्हती की आजची ही झोप तिच्यासाठी शेवटची ठरणार आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.


0 Comments