google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 झोपेत असलेल्या पत्नीसह मुलाची कुऱ्हाडीने हत्या..

Breaking News

झोपेत असलेल्या पत्नीसह मुलाची कुऱ्हाडीने हत्या..

 झोपेत असलेल्या पत्नीसह मुलाची कुऱ्हाडीने हत्या..

झोपेत असलेल्या पत्नी व मुलावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची हत्या केल्याची घटना मंजरथ (ता. माजलगाव) येथील काळे वस्तीवर मंगळवारी (ता. ११) घडली. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनेमागच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंजरथ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काळे वस्तीवरील पांडुरंग शिवाजी दोडतले (वय ३०) याचा लक्ष्मी शिरू शेंडगे (रा. लहामेवाडी) हिच्याशी दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन अपत्यांनंतर दोन महिन्यांपूर्वी लक्ष्मी तिसऱ्या प्रसूतीसाठी माहेरी गेली होती.

तिला तिसराही मुलगा झाला. नुकतीच ती मंजरथला सासरी आली होती. काल रात्री जेवणानंतर घरातील सर्व सदस्य झोपी गेले. आज पहाटेच्या सुमारास पांडुरंग शिवाजी दोडतले याने झोपेत असलेल्या पत्नी लक्ष्मीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घातला. तिच्या आक्रोशाने सहा वर्षाचा मुलगा पिल्या याला जाग आली. 

पांडुरंगने पिल्याच्या गळ्यावरही कु-हाडीने घाव घातला. त्यात माय-लेकाचा मृत्यू झाला. यानंतर पांडरंगने गळफास घेउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळ्याला लावलेली दोरी तुटल्याने तो बचावला. त्याच्या आरडाओरडीमुळे परिसरातील ग्रामस्थ जागे झाले. 

काहींनी पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी पांडुरंगला ताब्यात घेतले. त्याची पत्नी व मुलाला रक्ताच्या थारोळ्यातुन बाहेर काढले. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठवले.आई-वडील, भावाचीही चौकशी

पोलिसांनी पांडुरंग दोडतले याचे आई, वडील, भावाला ताब्यात घेउन चौकशी केली. पांडुरंग दोडतलेच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश खटकळ तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments