नगरपालिकेन जाहीर केलेल्या गुंठेवारी नियमात सुलभता व शिथिलता द्यावी:- शहीद अशोक कामटे संघटना
सांगोला( प्रतिनिधी) सांगोला नगरपालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या गुंठेवारी नियम व अटी मधील सुलभता व शिथिलता, पारदर्शकता आणावी याकरिता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देण्यात आले. गुंठेवारी नागरिकांना गुंठेवारी करण्याकरता नगरपालिकेने स्वतंत्र अधिकारी नेमावा व स्वतंत्र कक्ष निर्मिती करावी त्यामुळे सामान्य नागरिकांचे गुंठेवारी प्रश्नाचे निराकरण होईल
,जेणेकरून सामान्य नागरिकांना स्वमालकीची इमारती व खुले प्लॉट 31 डिसेंबर 2020 पूर्वीची गुंठेवारी प्रकरणी तातडीने निकाल निघतील .सदर प्लॉट धारकांना प्रतिगुंठे नुसार शासकीय शुल्क आकारणी जाहीर करावी ,एकाच वेळी एकाच गटातील शासकीय मोजणी करून त्याचा लाभ सर्व प्लॉट धारकांना होईल अशा पद्धतीने डीमार्केशन होऊन सामाइक ले आउट तयार व्हावेत
त्यामुळे अनेक प्लॉट धारकांना कमी शुल्कात मोजणी नकाशे, उतारे मिळतील संबंधितांना होणारा नाहक वेळ व शुल्क वाचेल .अनेक वर्षांपासून येथील नागरिक गुंठेवारी प्रकरणापासून वंचित आहेत सदर प्रकरणामुळे सुलभता व शिथिलता येण्याकरता नगरपरिषद सांगोला व भूमि अभिलेख सांगोला यांनी तातडीने प्रकरणे निकाली काढण्याकरिता आवश्यक ते सुसंवाद व बदल करावेत अन्यथा अनेक प्रकरणे प्लॉट धारक यापासून वंचित राहतील.
परिणामी शहराचे बकालीकरण वाढून नागरिक नागरी सुविधांपासून वंचित राहतील. येथील नागरिकांकडून थेट प्रस्ताव सादर करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी संघटनेकडे केली आहे . या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,जिल्हाधिकारी सोलापूर ,आमदार शहाजीबापू पाटील ,भूमी अभिलेख कार्यालय सांगोला यांनाही देण्यात आले आहे
तरी नगरपालिका भूमि अभिलेख कार्यालय यांनी नागरिकांकरता या कामी समन्वय राखून हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे अशी मागणी शहरातील अनेक लाभार्थ्यांनी शहीद अशोक कामटे संघटनेमार्फत लावून धरली आहे याचा गांभीर्याने विचार न केल्यास येथील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
नगरपालिकेने गेल्या सहा महिन्यापूर्वी नियमावली जाहीर करूनही अनेक लाभार्थ्यांनी वेळ खाऊ ,किचकट व आर्थिक भार सोसत नसल्यामुळे सदरचे प्रस्ताव सादर केले नाहीत केवळ 6-7 जणांनी गुंठेवारी प्रस्ताव सादर केले आहेत नगरपालिका हद्दीतील अनेक लाभार्थ्यांना प्रस्ताव या जाचकटीमुळे सादर करू शकेल नाही तरी नगरपालिका ,संबंधित विभाग यांनी शिथिलता देणे आवश्यक आहे:- नीलकंठ शिंदे सर, संस्थापक:- शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.


0 Comments