धक्कादायक ! पंढरपूर तालुक्यातील क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून युवा क्रिकेटरचा मृत्यू
पंढरपूर : क्रिकेट खेळा संबधी एक अतिशय धक्कादायक आणि वाईट बातमी समोर आली आहे. क्रिकेट स्पर्धेत खेळताना चेंडू गुप्तांगाला लागल्याने तरुणांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे घडली.
पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे या क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. विक्रम क्षीरसागर (वय ३५) हा खेळाडू नेपतगाव या टीम कडून बॅटिंग करीत होता. समोरच्या टीमच्या वेगवान गोलंदाजने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला. आणि तो काही क्षणातच मैदानात कोसळला.
त्याला तातडीने उपचारासाठी हलवले मात्र यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या खेळाडूंकडे नसल्यान असे दुर्दैवी प्रकार होतात.


0 Comments