google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नवीन पक्ष बनवला नाही तर तुम्ही आहात कोण ? कोर्टाचा सवाल

Breaking News

नवीन पक्ष बनवला नाही तर तुम्ही आहात कोण ? कोर्टाचा सवाल

 नवीन पक्ष बनवला नाही तर तुम्ही आहात कोण ? कोर्टाचा सवाल

सत्तासंघर्षावरून सुरू असलेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला . आजची सुनावणी नुकतीच संपली असून उद्या पुन्हा याप्रकरणी सुनावणी होणार आहे . दोन्ही गटातील वकिलांनी आज जोरदार युक्तीवाद केला . आप - आपली मते मांडताना दोन्ही गटांनीही कायदेशीर दाखले दिले . मूळ राजकीय पक्षाची व्याखाच ठाकरे गटाच्या कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवली तर , शिंदे गटाने सादर केलल्या लेखी

 युक्तीवादातील कायदेशीर मुद्दे सरन्यायाधिशांना समजले नसल्याने त्यांनी पुन्हा हे मुद्दा उद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत . त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष उद्याच्या सुनावणीकडे लागले आहे . सर्वोच्च न्यायालायातील घटनापीठासमोर शिवसेना , शिंदेगटाच्या भवितव्यावर सुनावणी सुरु झाली आहे . या दरम्यान पक्ष फुटीरतेचा बचाव पुरेसा होऊ शकत नाही , असा सवाल कोर्टाने शिंदे गटाला विचारला आहे . 

सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी , नवीन पक्ष बनवला नाही तर तुम्ही आहात कोण ? असा सवाल केला . त्यावर शिंदे गटाच्यावतीने हरिश साळवे यांनी , आम्ही एकाच पक्षातील दुसरा गट असल्याचे स्पष्ट केले तेव्हा सरन्यायाधीशांनी जर पक्षाचा नेता भेटत नाही तर म्हणून नवीन पक्ष बनवता येतो का ? असे विचारले . • यावर शिंदे गटाच्यावतीने , आम्ही एकाच पक्षाचे सदस्य आहोत .


 पण नेता बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे . निवडणूक आयोग आणि आताची सुनावणी याचा आता संबंध येथे दिसत नाही . पक्षात फुट पडलीअसेल तर बैठक कशी बोलवणार , या प्रकरणात पक्षांतरबंदी कायदा लागूच होत नाही . पक्षांतर बंदी कायदा लोकशाहीच्या आत्म्याला हात लावू शकत नाही . व्हीप विधीमंडळाला लागू होतो , पक्षाच्या बैठकीला नाही , असे सांगण्यात आले .

Post a Comment

0 Comments