धवलसिंह मोहितेचा निशाणा कुणावर? जिल्हा काँग्रेसच्या बैठकीला हजर न राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर.....
सोलापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी काँग्रेस भवन मध्ये पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेस भवन गजबजल्याचे दिसून आले. नुकतेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे
त्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक महत्त्वाची होती. सिंहासने काही दिवसांपूर्वी "धवलसिंह मोहिते पाटील गेले कुठे? रामानेही सोडली सिंहाची साथ" या हेडिंग खाली बातमी लावली होती. त्या बातमीची दखल जिल्हाध्यक्षांनी घेतल्याचं चित्र बुधवारी काँग्रेस भवनामध्ये दिसून आलं. माजी आमदार रामहरी रुपनवर हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. बैठकीस माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्यासह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन केले. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, या स्वातंत्र्यात काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा असून त्या प्रीत्यर्थ 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक तालुक्यात 75 किलोमीटर आजादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे असे सांगत येत्या पाच ऑगस्टला जिल्हा काँग्रेसच्या वतीने देशांमध्ये वाढत चाललेली महागाईच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मोहिते पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
0 Comments