महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी सुनावणी , पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको , कोर्टाचा महत्त्वाचा आदेश
शिवसेनेच्या चिन्हावर निर्णय घेऊ नका , कोर्टाचा आदेश
राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच कायम राहिला आहे . कारण , आज संपूर्ण राज्याचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागलेलं असताना ही सुनावणी पुन्हा 8 ऑगस्ट रोजी होणार आहे .
दरम्यान , सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये , असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत . सोमवारच्या सुनावणीवेळी कोर्टाकडून हे प्रकरण मोठ्याखंडपीठाकडे द्यायचं की नाही , हे सुद्धा ठरवण्यात येणार आहे .
शिंदे गटाने पक्ष सोडलेला नाही असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी शिंदे गटाकडून केला होता . त्यावर शिंदे गटाने पक्ष सोडला नाही मग ते निवडणूक आयोगाकडे का गेले , असा प्रतिप्रश्न शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला .
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत . मात्र , या प्रकरणी निवडणूकमात्र , निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले . आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्यांवर प्रलंबित असलेल्या याचिकेवरील सुनावणी आठ ऑगस्ट रोजी होणार आहे .
0 Comments