" स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत " हर घर तिरंगा उपक्रम . जनजागृती मोहिमेनिमित्त सांगोला शहरात प्रभात फेरीसाठी उपस्थित राहणे.. तहसीलदार मा. अभिजीत सावर्डेकर पाटील
" स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव " निमित्त सर्व देशभर दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत " हर घर तिरंगा हा उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आलेले आहे .
तरी " स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव " अंतर्गत " हर घर तिरंगा हा उपक्रम राबविणेकामी सांगोला तालुक्यामध्ये नागरीकांना " हर घर तिरंगा विषयी माहिती देणे व मोठ्या प्रमाणात जनजागृती करणेसाठी सांगोला शहरामध्ये प्रभात फेरी काढणेत येणार आहे . तरी सदर प्रभात फेरीसाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथील प्रांगणात e.00 दिनांक ०५/०८/२०२२ रोजी सकाळी वाजता उपस्थित राहावे .
0 Comments