डाळिंबाच्या बागेत गांजाची लागवड; 13 लाखांचा 133 किलो गांजा जप्त!
जत: जत तालुक्यातील माणिकनाळ गावात डाळिंबाच्या बागेत गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी छापा टाकत 13 लाख रुपयांचा 133 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, जत तालुक्यातील माणिकनाळ इथे महासिद्ध लक्ष्मण बगली याच्या डाळिंब बागेत छापा टाकून 13 लाख 39 हजार 100 रुपयांचा 133 किलो 91 ग्रॅम ओला गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे. महासिद्ध बगली हा कुटुंबासमवेत गावात राहतो. डाळिंबाच्या शेतात त्याने गांजाची लागवड केल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक पंकज पवार यांनी बुधवारी (3 ऑगस्ट) बगली याच्या शेतात छापा टाकला. त्याच्या डाळिंब बागेत 5 ते 6 फूट उंचीची गांजाची लहान-मोठी झाडे सापडली. त्यांचे वजन 133 किलो 91 ग्रॅम होते. याची किंमत 13 लाख 39 हजार 100 रुपये आहे.
दरम्यान, याबाबतची फिर्याद हवालदार श्रीशैल वळसंग यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.
0 Comments