google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

Breaking News

'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन 

 मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते तथा ‘मोरूची मावशी’ फेम प्रदीप पटवर्धन यांचे आज हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचंत्यांनी अखेरचा स्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदराने घेतले जाणारे नाव कोणते असेल तर ते प्रदीप पटनवर्धन होय. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप पटवर्धन प्रेक्षकांच्या भेटीस आले. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मराठी सिनेसृष्टीत मानाने आणि अभिमानाने मिरवावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मोरूची मावशी या नाटकाने तर मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.


‘या’ चित्रपटांमध्ये केले काम

प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोला बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

Post a Comment

0 Comments