google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीसदादाने मागितली तब्बल एक कोटीची लाच !

Breaking News

पोलीसदादाने मागितली तब्बल एक कोटीची लाच !

 पोलीसदादाने मागितली तब्बल एक कोटीची लाच !

कोल्हापूर : पोलीस शिपायाने एका वृद्ध शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटीची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यातून पोलीस शिपायाची भूक किती असू शकते हेच दिसून आले आहे.


पोलीस आणि भ्रष्टाचार यांचा संबंध किती जवळचा आहे हे सामान्य जनतेलाही माहित आहे. काही पोलीस आयुष्यभर कष्ट उपसत राहतात पण कुणाच्या रुपयात मिंदे होत नाहीत तर काहीजण आयुष्यभर केवळ वसुलीचेच उद्योग करतात. पोलीस शिपायांना आपली सेवा बजावताना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. 


कोरोनाच्या कालावधीत पोलिसांचे परिश्रम सर्वानाच पाहायला मिळाले आहेत पण काही मोजके पोलीस इमानदार असलेल्या पोलिसांच्या परिश्रमावर पाणी टाकतात आणि चांगल्या पोलिसांना देखील बदनाम व्हावे लागते. महसूल, पोलीस हे विभाग लाच प्रकरणात नेहमीच चर्चेत येत असतात आणि शिपायापासून साहेबांपर्यंत अनेकजण लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात अडकत देखील असतात. पोलीस काही किरकोळ रकमेची लाच मागतात असा कुणाचा समज असेल तर तो खोटा आहे हे दाखविणारा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. 


हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील ४० वर्षीय पोलीस शिपाई जॉन तिवडे याच्याविरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात दाखल असलेल्या दाव्याचा निकाल आपल्या बाजूने करून देतो असे सांगून एका वृद्ध शेतकऱ्याकडे एक कोटी लाचेची मागणी केल्याचे हे प्रकरण असून लाचेची रक्कम ऐकून पोलीस खाते देखील हादरले आहे. 

सदर पोलीस शिपायावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला अद्याप अटक झालेली नसून लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संशयित पोलिसावर आधीही एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या प्रकरणी त्याला निलंबित देखील करण्यात आले होते. त्यानंतर आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल झाला .

Post a Comment

0 Comments