सांगोल्याजवळ अपघातात 1 जण जागीच ठार तर 1 जण जखमी
- सांगोल्याजवळ मारुती स्विफ्ट उलटून सांगलीचा तरुण ठार मिरज - पंढरपूर रस्त्यावर सांगोला तालुक्यातील हतीद जवळ आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगलीहून पंढरपूरकडे निघालेली मारुती स्विफ्ट ( एमएच 12 जीआर 5294 ) उलटून झालेल्या अपघातात
सांगली येथील मार्केट यार्डातील हळद व्यापारी सर्फराज सलीम ढांकवाला ( रा . दक्षिण शिवाजी नगर , चांदणी चौक , सांगली ) हा तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला आहे . या अपघाताची नोंद सांगोलापोलिसात करण्यात आली आहे . सांगली येथील हळद व्यापारी सर्फराज सलीम ढांकवाला आणि मनोज मारुती शिंदे हे दोघे मारुती स्विफ्टमधून पंढरपूरकडे पासपोर्ट काढण्यासाठी निघाले होते .
सकाळी 6 वाजता ते सांगलीतून निघाले सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मिरज - पंढरपूर रस्त्यावरून हतीद गावाच्या पुढे आले असता गाडीच्यापुढे अचानक कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचवण्यासाठी सर्फराज यांची गाडी उजव्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर जाऊन गाडी पलटी झालीआणि गाडीतून सर्फराज बाहेर फेकला गेला . त्याच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला .
तसेच मनोज शिंदे याच्या खांद्याला आणि मनगटाला दुखापत होऊन तो जखमी झाला आहे . सर्फराज याच्या डोकीस , कपाळास मोठी दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला . सर्फराज आणि जखमी मनोज शिंदे यांना सांगोला प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले . मात्र त्यापूर्वीच सर्फराजचा मृत्यू झाला होता . या अपघातात कार गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे .


0 Comments