google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आश्चर्यच ! कबरीतून जिवंत बाहेर आली बालिका ! देवाचा चमत्कार की डॉक्टरांचा निष्काळजीपणा !

Breaking News

आश्चर्यच ! कबरीतून जिवंत बाहेर आली बालिका ! देवाचा चमत्कार की डॉक्टरांचा निष्काळजीपणा !

 आश्चर्यच ! कबरीतून जिवंत बाहेर आली बालिका ! देवाचा चमत्कार की डॉक्टरांचा निष्काळजीपणा !

नवजात बालिकेला रुग्णालयाने मृत घोषित केल्याने तिचे दफन केले होते. मात्र काही वादविवादमुळे तिचा मृतदेह तिथून पु्न्हा बाहेर काढण्याची वेळ आली. मात्र बाहेर काढल्यानंतर ती बालिका जिवंत असल्याचे लक्षात आल्याची आश्चर्यकारक घटना काश्मिर येथील बनिहाल येथे घडली आहे.


रामबन जिल्ह्यातील बनिहाल शहरातील शमीमा बेगम यांची सोमवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात सामान्य प्रसुती झाली. शमीमा बेगमचे पती बशारत अहमद गुजर यांच्या म्हणण्यानूसार, बाळाच्या जन्मानंतर हॉस्पीटलने तिला मृत घोषित केले. जवळपास दोन तास मुलगी रुग्णालयातच होती. त्यानंतर कुटुंबाने रुग्णालयाजवळील होलन गावात मुलीचे दफन केले व गावी जाण्यास निघाले.


दरम्यान, स्थानिक नागरिकानी मुलीचे तिथे दफन करण्यास विरोध केला. तासाभराच्या वादानंतर कुटुंबियानी मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला. त्यावेळी मुलगी जिवंत असल्याचे लक्षात आले. कुटुंबियांनी तात्काळ मुलीला घेऊन रुग्णालय गाठले. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुलीला श्रीनगरला दाखल करण्यात आले.


हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा असल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. या प्रकरणाची दखल घेत स्त्रीरोग विभागात काम करणाऱ्या एका ज्युनिअर स्टाफ नर्स आणि सफाई कामगाराला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.

Post a Comment

0 Comments