ब्रेकिंग: पुन्हा राज्यात मास्क सक्ती; आरोग्य विभागाचा आदेश!
मुंबई : कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याने राज्यात आता पुन्ही मास्क सक्ती करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाने एक पत्र जारी केले असून आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती असणार आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स सदस्यांसमवेत एका बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोना नियम पाळण्याचे आवाहन देखील केले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मास्क सक्ती करणार नसल्याचे सांगितले होते.परंतु, नागरिकांनी स्वत:च गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे असे आवाहन केले होते.
परंतु, आज पुन्हा राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू करण्यात आली असून रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा अशा ठिकाणी मास्क सक्ती केल्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
दरम्यान, वाढत्या राज्यातील कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कालच चिंता व्यक्त केली होती. तसेच, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे त्यामुळे जिल्ह्यातील टेस्टिंग, लसीकरण वाढवण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना करणारे पत्र केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पाठवले होते.
0 Comments