सिनेमा पाहून बाहुलीला फास लावला अन् मग चिमुकल्यानेही घेतला गळफास
पुणे : पुणे जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आई कामात व्यस्त असताना आठ वर्षांच्या चिमुरडयानं आधी बाहुलीला फाशी दिली आणि त्यानंतर स्वत: देखील गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचं समज झाल्यानंतर या मुलाने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेत या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरीतील थेरगाव परिसरात घडली आहे.
घटनेत मृत पावलेल्या मुलाला मोबाइलवर 'हॉरर' फिल्म पाहण्याची सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.


0 Comments