google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चालत्या कारने पेट घेतला , कारचे दरवाजे जॅम झाल्याने चालक जिवंत जळाला , पुण्यातील व्यक्तीचा दुर्दैवी अंत

Breaking News

चालत्या कारने पेट घेतला , कारचे दरवाजे जॅम झाल्याने चालक जिवंत जळाला , पुण्यातील व्यक्तीचा दुर्दैवी अंत

 चालत्या कारने पेट घेतला , कारचे दरवाजे जॅम झाल्याने चालक जिवंत जळाला , पुण्यातील व्यक्तीचा दुर्दैवी अंत


मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एक भीषण अपघात झाला. बैतुल परासिया राज्य मार्गावर चालत्या कारला आग लागली, ज्यामध्ये चालकाचा वेदनादायी मृत्यू झाला. सुनील सिंदप्पा (वय ३९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.


सिंदप्पा हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत अभियंता होते. सुनील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी सासरच्या घरी मोतीवार्ड, बैतूल येथे गेले होते.

हा अपघात गुरुवारी संध्याकाळी घडला, सुनील हनुमान डोल मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. त्यानंतर बैतुल परसिया राज्य मार्गावरील खामालपूर गावाजवळ सुनील यांच्या कारला आग लागली आणि कार नियंत्रणाबाहेर होऊन झाडावर जाऊन आदळली. कारचे दरवाजे जॅम झाल्याने सुनील कारमधून बाहेर पडू शकले नाही आणि भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.


रस्त्याने ये-जा करणाऱ्यांकडून घटनेची माहिती मिळताच राणीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घोडा डोंगरी येथून अग्निशमन दलाची गाडी मागवली, त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. कार पूर्णपणे जळाल्याने चालकाची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी चेसीस नंबरवरून कारचा नंबर ट्रेस केला, तेव्हा ती गाडी सुनीलच्या नावावर नोंदणीकृत महाराष्ट्र पासिंगची असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच सुनीलच्या सासरी शोककळा पसरली. शवविच्छेदनानंतर मृत व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या संदर्भात केस दाखल करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments