google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्नी नांदायला येत नसल्याच्या संतापात सासूची हत्या

Breaking News

पत्नी नांदायला येत नसल्याच्या संतापात सासूची हत्या

 पत्नी नांदायला येत नसल्याच्या संतापात सासूची हत्या 

नसल्याच्या कारणातून संताप अनावर झालेल्या जावयाच्या हातून सासूची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भांडण सोडवण्यास आलेल्या पत्नी व मुलीवर विळ्याचे वार झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. त्रंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुय. 


येथील जोशी कंपनीनजीक पाड्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी घोटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसन पारधी असे संशयीत आरोपी असलेल्या जावयाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास संशयित किसन पारधी याने पत्नी सासरी नांदावयास का येत नाही अशी विचारणा करत पत्नीच्या गळ्यावर विळ्याने हल्ला केला. 


यावेळी सासू कमळाबाई सोमा भुतांबरे (55) व संशयिताची मुलगी माधुरी किसन पारधी (12) अशा दोघी जणी मदतीला धावून आल्या. संशयिताने माधुरी पारधी हिच्या हातावर विळ्याने वार केला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली तर सासू कमळाबाई भुतांबरे यांच्या पोटात व पाठीत कात्री भोसकल्याने त्या जागीच गत:प्राण झाल्या. पत्नी इंदुबाई पारधी हिच्या गळ्यावर विळ्याने वार झाल्याने ती देखील गंभीर जखमी झाली.

Post a Comment

0 Comments