google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यसभेसाठी सहकार्य करा, सफारी गाडी देऊ.. ‘त्यांच्याकडून’ आमदारांना मोठी ऑफर

Breaking News

राज्यसभेसाठी सहकार्य करा, सफारी गाडी देऊ.. ‘त्यांच्याकडून’ आमदारांना मोठी ऑफर

 राज्यसभेसाठी सहकार्य करा, सफारी गाडी देऊ.. ‘त्यांच्याकडून’ आमदारांना मोठी ऑफर

सध्या महाराष्ट्रामध्ये राज्यसभेसाठी चांगली चुरस निर्माण झाली आहे. सहा जागेंसाठी सर्वच पक्षांनी आता कम्बर कसली आहे. भाजपानं तिसरा उमेदवार उभा केल्याने आणखीनच रंगत वाढली आहे. सुरुवातीला संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्याची घोषणा केली होती.


त्यावरूनही बरेच राजकारण झाले. परंतु त्यांनी यातून माघार घेतल्यानंतर राज्यसभेच्या ६ जागांसाठी महाविकास आघाडीने ४ उमेदवार दिले आहेत. मविआकडे ३ उमेदवार निवडून येतील इतकी मते आहेत. तर भाजपानेही या निवडणुकीत ३ उमेदवार देऊन चुरस निर्माण केली आहे. भाजपाकडे २ उमेदवार निवडून येण्याइतपत मतांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता या निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक अपक्ष उमेदवार उतरणार आहेत.


त्यांनी थेट सफारी गाडी भेट देण्याचं आश्वासन दिल आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले आहे. अरुण निटुरे म्हणाले की, पक्षाच्यावतीने राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. सर्व आमदारांनी सहकार्य करून मला संसदेत पाठवावं.जे आमदार मदत करतील त्यांना पक्षाच्या वतीने सफारी गाडी भेट देऊ. कार्यकर्त्यांच्या सहभागातून हे सहकार्य करू ही लालच नाही असेहह ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments