google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शुभकार्यात विघ्न ! लग्नातील जेवणातून झाली दोनशेहून अधिकांना विषबाधा लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना

Breaking News

शुभकार्यात विघ्न ! लग्नातील जेवणातून झाली दोनशेहून अधिकांना विषबाधा लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना

 शुभकार्यात विघ्न ! लग्नातील जेवणातून झाली दोनशेहून अधिकांना विषबाधा लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना 

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथे घडली आहे. या लग्नसंरभात जवळपास २५० जणांना विषबाधा झाली असून


त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने या विषेबाधेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र लग्नसमारंभासारख्या शुभकार्यामध्ये विषबाधा झाल्यामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी. निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील तरुणीचा देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील तरुणाशी रविवारी (दि. २२) केदारपूर येथे विवाह पार पडला. या विवाहासाठी केदारपूर, काटेजवळगा, अंबुलगा बु, सिंदखेड या गावातून वऱ्हाडी आले होते.लग्न लागल्यानंतर भरपेट जेवण करून वऱ्हाडी आपआपल्या गावी निघून गेले. मात्र, सायंकाळी ७ वाजल्यानंतर सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले. पोट दुखणे, उलट्या, जुलाब असा त्रास सर्वांना सुरू झाला. निलंगा तालुक्यातील अंबुलगा उपजिल्हा रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले.


विषबाधेमुळे सुमारे 250 जणांवर उपचार करण्यात आले. तसेच यशस्वी उपचार केल्यानंतर सर्वांना घरी पाठवण्यात आले. विषबाधा गंभीर स्वरुपाची नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका नाही असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments