मोठ्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर; केला मोठ्या भावाचा खून!
बुलडाणा : 28 एप्रिल 2017 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात मोठ्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून लहान भाऊ सतत शरीरसुखाची मागणी करत होता. ही बाब मोठ्या भावाला कळताच त्याने लहान भावाला सुनावले. याचा राग मनात धरत लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात वखराची पास टाकली. या घटनेत मोठ्या भावाचा मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी लहान भावाला शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. निलेश गणपत फुसे (वय २२) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील रमेश गणपत फुसे (वय २६) आणि निलेश गणपत फुसे (वय २२) हे दोन सख्ये भाऊ. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या या दोन्ही भावात एकमेकांविषयी खूप प्रेम होते. काही दिवसांनी रमेशचे लग्नही झाले, सर्व काही सुरळीत चालू असताना, लहान भाऊ निलेश हा दारूच्या आहारी गेला. सतत दारू पिऊन निलेश हा घरी येत असल्याने रमेश आणि त्याच्यात सतत खटके उडू लागले. तसेच, तो दारूच्या व्यसनात टुल्ल झालेल्या निलेशची मोठ्या भावाच्या पत्नीवरही वाईट नजर होती. त्यामुळे रमेश आपली पत्नी आणि लहान मुलीला घेऊन शेतात राहण्यासाठी गेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल २०१७ च्या रात्री निलेश हा दारुच्या नशेत रमेश राहत असलेल्या शेतातील घरी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने रमेशला आवाज देत दार उघडण्याचे सांगितले. त्यानंतर मला तुझ्या पत्नीसोबत झोपायचे आहे असे म्हणत त्याने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे रमेशने शिवीगाळ करुन निलेशला शेतातून रात्रीच्या वेळेस काढून दिले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निलेश परत शेतात आला. त्यावेळी रमेश हा घराच्या ओसरीत झोपलेला होता.त्यावेळी निलेशने रमेशसोबत पुन्हा वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच रमेशच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. यावरून दोघांचा वाद झाला. हा वाद इतका वाढत गेला की, निलेशने मोठा भाऊ रमेशच्या डोक्यात वखराची पास मारली. या घटनेत रमेश गंभीर जखमी झालात. त्याला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी रमेशच्या पत्नीने जळगाव जामोद पोस्टेला तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी निलेश फुसे याच्या विरुध्द पोलिसांनी कलम ३०२, ५०४,५०६ भादंविचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.


0 Comments