google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाई गणपतरावांनी स्वतःची 37 एकर जमीन वाटली

Breaking News

भाई गणपतरावांनी स्वतःची 37 एकर जमीन वाटली

 भाई गणपतरावांनी स्वतःची 37 एकर जमीन वाटली

शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हे सांगोला येथे आले होते. त्यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन स्व. गणपतराव यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांची भेट घेतली. त्यांना बोलते केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला.


सांगोला/ भाई गणपतराव देशमुखांनी आयुष्यात संपत्ती कमावली नाही. इतर मंत्री, आमदार इतके पैसे कमावतात याची खंत त्यांना कधीही वाटली नाही. आपल्या शेतात असलेल्या कुळांना ३७ एकर जमीन स्वखुशीने वाटून टाकली. ही आठवण सांगितली आहे स्व. गणपतराव यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांनी.


हेरंब कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत . तॆ वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन करतात. हेरंब कुलकर्णी हे इ.स. २००६ मध्ये “साधना” साप्ताहिकाच्या संपादक मंडळात होते. दारूबंदीसाठी चाललेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. या लढ्याला अभ्यासातून धोरणात्मक पाया देण्याचे काम ते करत आहेत.

शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हे सांगोला येथे आले होते. त्यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन स्व. गणपतराव यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांची भेट घेतली. त्यांना बोलते केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला.याबाबत हेरंब कुलकर्णी यांनी एक फेसबुक पोस्ट सविस्तर लिहिली आहे. त्यातून भाई गणपतराव देशमुख यांच्या व्रतस्थ आयुष्याचा जीवनपट उलगडला आहे. ती फेसबुक पोस्ट जशीच्या तशी देत आहोत.


बालविवाहाचा अभ्यास करताना सोलापूर जिल्ह्यात गेल्यावर आवर्जून सांगोला येथे गेलो. यापूर्वी स्व. गणपतराव देशमुखांना कधी भेटलो नाही. याची खंत कायमच मनात आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर आवर्जून गणपतराव देशमुख यांच्या घरी गेलो. त्यांच्या मृत्यूनंतर मी लिहिलेली कविता महाराष्ट्रात खूपच वाचली गेली होती. तेव्हा त्या कुटुंबीयांनी मला फोनही केला होता. घरी गणपतराव देशमुख यांचे माझ्या संपर्कात असलेले त्यांचे स्वीय सहायक अनिल खरात व गणपतराव यांच्या पत्नी रतनबाई भेटल्या.


आज नव्वदीच्या घरात वय असलेल्या. त्यांचे ऐकणे बोलणे विचार करणेअजूनही स्पष्ट आहे. प्रत्येक प्रश्नावर बोलताना नेमकेपणा आहे. मी सहज विचारलं गणपतराव इतके वर्षे आमदार असताना तुम्ही मुंबईत किती वेळा गेलात? त्या हसून म्हणाल्या “फक्त दोन वेळा.. मुलगा एकदा आजारी होता तेव्हा त्याला दाखवायला मुंबईत नेले व दुसऱ्यांदा अशाच काहीतरी कारणाने पण मुंबईला मला कधीच जावेसे वाटले नाही, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.


“गणपतरावांनी आयुष्यात संपत्ती कमावली नाही. इतर मंत्री आमदार इतके पैसे कमावतात याची खंत कधी वाटली का?” असे विचारल्यावर त्या म्हणाल्या “त्यांचे त्यांच्याजवळ आमचे आमच्या जवळ. मी कधीच लोकांशी तुलना करत नाही, केली नाही जे आम्हाला पटले ते आम्ही केले व तसेच जगलो”. त्या पुढे म्हणाल्या “आमच्या शेतात असलेल्या कुळांना ३७ एकर जमीन आम्ही वाटून टाकली, हक्काची जमीन दिली तिथे इतरांची संपत्ती घेऊन काय करू?”


“गणपतरावांमुळे घरी खूप लोक सतत जेवायला येत असतील, सतत कष्ट करून वैताग वाटला नाही का?” असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, “त्यात काय वाटायचं? माहेरी असल्यापासूनच आमच्या घरी खूप लोक यायचे. त्यामुळे या साऱ्या गोष्टी सरावाच्या आहेत.त्यात काय विशेष वाटले नाही.. बोलण्यात कोणताही गर्व नाही. आपण काही विशेष केले असा कोणताही भाव नाही. गणपतरावांची खऱ्याअर्थाने व्रतस्थपणे पाठराखण त्यांनी केली. घरात राहून कष्ट करत आयुष्यभर राजकारणाची पाठराखण केली. पतीच्या स्थानाचा लाभ घेत मोठेपणा मिरवावा असेही कधी वाटले नाही.. हे गर्दीतले स्वाभाविक वैराग्य कशातून येत असेल?

Post a Comment

0 Comments