google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निरा उजवा कालव्याच्या सांगोला शाखा कालवा की मी ८५ ते १०३ बंदिस्त पाईपलाईन कामाचे आज होणार भूमिपूजन-आमदार शहाजीबापू पाटील.

Breaking News

निरा उजवा कालव्याच्या सांगोला शाखा कालवा की मी ८५ ते १०३ बंदिस्त पाईपलाईन कामाचे आज होणार भूमिपूजन-आमदार शहाजीबापू पाटील.

 निरा उजवा कालव्याच्या सांगोला शाखा कालवा की मी ८५ ते १०३   बंदिस्त पाईपलाईन कामाचे आज होणार भूमिपूजन-आमदार शहाजीबापू पाटील.

सांगोला /प्रतिनिधी.सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब राज्याचे  जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनी निरा उजवा कालव्याच्या सांगोला शाखा कालवा कि मी ८५ ते १०३या

१८किलोमीटर अंतर असलेल्या बंदिस्त पाईपलाईन कामासाठी ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत या कामाचे वाढेगाव येथे आज सायं ४वाजता भूमिपूजन होणार आहे या बंदिस्त पाईपलाईन मुळे आलेगाव,मेडशिंगी, वाढेगाव, देवळे आणि सावे या पाच गावातील२१५९ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार  असल्याने या गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.


२०१९ विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथील प्रचार सभेमध्ये दिलेल्या आश्वासनाची  पूर्तता होत असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी आनंदी आहेत शेतीच्या पाण्याच्या योजना बरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजना ही आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठया प्रमाणावर  मंजूर करून आणल्या असल्याने  दुष्काळी सांगोला तालुका ही ओळख कायमस्वरूपी मिटणार आहे. 


 नीरा उजवा कालव्याच्या सांगोला  शाखा कालव्याच्या कि मी ८५ ते १०३बंदिस्त पाईपलाईन  कामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शूभहस्ते माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा पी सी झपके, बाबुराव गायकवाड, प्रफुल कदम, तानाजीकाका पाटील, सूर्यकांत घाडगे, मधुकर बनसोडे, सुनिल भोरे, या मान्यवरांच्या  उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments