सांगोला शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही -आमदार शहाजीबापू पाटील शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाचे सर्वेक्षण चालू
सांगोला/ प्रतिनिधी सांगोला शहरातील बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेल्या व शहराच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या भुयारी गटार योजनेच्या कामाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाचा काल सांगोला शहरातील वाढेगाव नाका येथील स्मशानभूमी पासून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करुन सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की मी मागील वर्षापासून नगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी राज्याचे नगरविकास मंत्री मा एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून२० कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे यापुढील कार्यकाळामध्ये सांगोला शहरातील विविध विकास कामाकरिता भरघोस निधी आणला जाईल शहरातील भुयारी गटार योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून हे काम लवकर चालू केल जाईल शहरातील कोणतेही काम निधी अभावि प्रलंबित राहणार नाही विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही माझ्या मागील कार्य काळामध्ये सांगोला शहरातील पाणीपुरवठ्याचे मोठे काम झाले
असून वास्तविक पाहता पाणीपुरवठ्याचे काम झाल्यानंतर भुयारी गटाराचे काम होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही मी २०१९ विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यापासून भुयारी गटार योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे भुयारी गटारीचे काम चालू झाले की लगेच शहरातील रस्ते व लाईटचे काम जलदगतीने करून सांगोला शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील व प्रा पी सी झपके यांची मनोगते झाली दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना म्हटले की आमदार शहाजीबापू पाटील यांचा मुंबईचा दौरा कधी मोकळ्या हाताने परत येत नाही
बापू आमदार झाल्या पासून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्याच्या योजना, तालुक्यातील रस्ते व मूलभूत सुविधा करिता महाविकास आघाडी सरकारकडून भरघोस निधी खेचून आणला आहे, यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, बाबुराव गायकवाड, उदयबापू घोंगडे, चेतनसिंह केदार, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपअभियंता रविकांत ढावरे, शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब,दीपक उर्फ गुंडा
खटकाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील,समीर पाटील,काँग्रेसचे शहराध्यक्ष तोहिद मुल्ला, प्रा संजय देशमुख सर, आनंद घोंगडे, अनिल खडतरे, शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, सोमनाथ लोखंडे, सोमेश यावलकर, पूजा पाटील यांच्यासह मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
0 Comments