google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंकीपॉक्सचा ‘त्या’ वयोगटाला जास्त धोका; सरकारी यंत्रणा सज्ज

Breaking News

मंकीपॉक्सचा ‘त्या’ वयोगटाला जास्त धोका; सरकारी यंत्रणा सज्ज

 मंकीपॉक्सचा ‘त्या’ वयोगटाला जास्त धोका; सरकारी यंत्रणा सज्ज 

मुंबई :आजारांचे थैमान काही केल्या संपायचे नाव घेत नाही, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चालले आहे. कोरोना संपतच होता की जगभरात मंकीपॉक्सने धुमाकूळ घातला आहे. खरं तर मंकीपॉक्स हा आफ्रिकन आजार पण आज तो जगातील बहुतांश देशात जाऊन पोहचला आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सगळ्यांना याबाबत सावधानतेचा इशारा देखील दिला आहे. गेल्या 20 दिवसांत हा आजार 21 देशांत जाऊन पोहचला असून या आजाराचे खूप रुग्ण आढळले आहेत. भारतात अजुन एकही रुग्ण आढळला नाही, ही जरी दिलासादायक बाब असली तरी सरकार मात्र या बाबतीत सतर्क आहे.


नुकतीच एक महत्वाची बातमी याबाबत समोर आली आहे. मंकीपॉक्सचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे देशात मुलांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून येतात का यावर बारीक लक्ष ठेवायला हवे , असा इशारा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर) या संस्थेने दिला आहे. मंकीपॉक्सच्या विषाणूंमध्ये अद्याप एकही जनुकीय बदल झालेला नाही. मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतरही या विषाणूंमध्ये परिवर्तन झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळलेले नाही.


अर्जेंटिनामध्ये शुक्रवारी मंकीपॉक्सचे दोन रुग्ण सापडले. विशेष म्हणजे, दोन्ही विषाणूग्रस्त पुरुष रुग्ण नुकतेच स्पेनमधून अर्जेंटिना येथे आले आहेत. या विषाणूचे लॅटिन अमेरिकेत सापडलेले ते पहिले रुग्ण आहेत. या महिन्यात जगभर पसरलेल्या मंकीपॉक्स संसर्गाचा केंद्रबिंदू स्पेन हा देश आहे. शुक्रवारपर्यंत स्पेनमध्ये या संसर्गाचे 98 रुग्ण आढळले होते.


मंकीपॉक्सचे ब्रिटनमध्ये आजवर 106 पोर्तुगालमध्ये 74 रुग्ण सापडले. त्याशिवाय कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, इटली, अमेरिकेसह अन्य देशांतही हा आजार पसरला आहे. परंतु मंकीपॉक्सचा लहान मुलांना जास्त धोका असल्यामुळे त्यांच्या पालकांनी सतर्क राहून आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments