ब्रेकींग : सोलापुरात पोलीस हवालदार बडतर्फ ; आयुक्त हरिष बैजल यांचा दणका
सोलापूर : सोलापूरचे पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी आरसीपीमध्ये नियुक्त पोलिस हवालदार आप्पा पवार याला बडतर्फ केले. पोलिस खात्यातील शिस्तभंगप्रकरणी ही कारवाई केली असून, खुद्द बैजल यांनी यास दुजोरा दिला आहे.
यापूर्वी बळीरामा माशाळकर यांनाही अशाच पद्धतीने बैजल यांनी बडतर्फ केले होते.एकूणच आयुक्त बैजल यांच्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे. तत्कालिन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहर पोलिस दलातील वसुलीबहाद्दरांना हेरून त्यांची मुख्यालयात बदली केली होती, तर काही जणांना निलंबित केले होते.
शिंदे यांची बदली झाल्यानंतर आयुक्तपदाचा पदभार बैजल यांनी स्विकारल्यानंतर त्यांनीही हाच पायंडा चालू ठेवत या वसुलीबहाद्दर कर्मचाऱ्यांना मुख्यालयातच ठेवले होते. परंतु, पोलिस खात्याच्या शिस्तीस बाधा पोहोचवणारे कृत्य केल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी आयुक्त बैजल यांनी माशाळकर व आप्पा पवार यांना निलंबित केले होते. चौकशीअंती काही दिवसापूर्वी माशाळकर यांना सेवेतून बडतर्फ केले होते. पाठोपाठ पवार यांचीही चौकशी करून त्यांच्यावर नुकताच कारवाईचा बडगा उगारला.


0 Comments