वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी रमेश पवार .
सांगोला (प्रतिनिधी)आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलीत वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी रमेश मच्छिंद्र पवार सर यांची संस्थेच्या वतीने नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
सुरुवातीस संस्थेचे संस्थापक कै. वामनराव शिंदे साहेब व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्षा श्रीमती .कौशल्यादेवी शिंदे मॅडम ,रामभाऊ शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .यावेळी नुतन मुख्याध्यापकपदी रमेश पवार यांची निवड झाल्याबद्दल सरपंच रामभाऊ शिंदे यांनी शाल ,श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करून कार्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळी मनोगतात मुख्याध्यापक पवार सर यांनी प्रशालेच्या गुणवत्तावाढीसाठी व संस्थेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे सामर्थ्यपणे पेलण्याचे आश्वासित करून संस्थेबद्दल ऋण, कृतज्ञता व्यक्त केली .यापुढील काळात यशाचा आलेख निश्चितपणे वाढवणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव निळकंठ शिंदे सर तर सूत्रसंचालन संतोष कुंभार सर यांनी केले यावेळी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments