सोलापूर: महिलेचा दोन लहान मुलांसह विहिरीत आढळला मृतदेह; आत्महत्येची शक्यता!
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारातील एका विहिरीत विवाहित महिलेचा दोन लहान मुलांसह मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्महत्या केलेली महिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्हेहाळ गावची रहिवासी आहे. महिलेचे नाव सोनाली चोपडे, मोठा मुलगा संतोष चोपडे आणि लहान मुलगा संदीप चोपडे अशी मृतांची नावे आहेत.
या प्रकरणाची माहिती सुरेश चोरमले याने वळसंग पोलीस ठाण्यात दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव येथे दयानंद शिंदे यांची शेती आहे. या शेतात तिल्हेहाळ येथील विवाहित महिला सोनाली चोपडे हिने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. सादर घटनेचा पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.
0 Comments