मा.दिपकआबा वि.का.स. सेवा संस्था अजनाळे आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था लिगाडेवाडी दोन्ही सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा..!
नूतन चेअरमन आणि संचालक मंडळाचे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून कौतुक
दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी देशाच्या नकाशावर आपली ओळख मिळविलेल्या अजनाळे ता. सांगोला येथील मा. दिपकआबा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि अजनाळे नजीक असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिगाडेवाडी या दोन्ही सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाची धूळदान केली आहे.
या दोन्ही विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांनी गुरुवार दि. २६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची राष्ट्रवादी भवन येथे भेट घेतली. यावेळी सहकारी संस्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अबाधित ठेवल्याबद्दल दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सर्व नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन, तसेच संचालकांचे विशेष कौतुक केले.
मा दिपकआबा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था अजनाळे या संस्थेच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन मारुती येलपले यांची तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादीचे सुरेश मोतीराम धांडोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. गुरुवार दिनांक २६ रोजी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे चेअरमन व्हा. चेअरमन यांच्यासह नूतन संचालक चंद्रकांत कोळवले, मधुकर लाडे, तातोबा येलपले, वसंत येलपले, सुखदेव विटेकर, संजय कोळवले, लक्ष्मण येलपले, जगन्नाथ शेंबडे, दत्तात्रय खंडागळे, अंजना लाडे व अनुसया यड्रावकर आदी उपस्थित होते.
तसेच विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था लिगाडेवाडी संस्थेच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल नामदेव शिंदे, व्हा. चेअरमन मोहन ज्ञानू गायकवाड, आदींसह नूतन संचालक हनमंत शिंदे, हरिदास लिगाडे, दादासो शिंदे, आगतराव लिगाडे, संभाजी शिंदे, ब्रह्मदेव शिंदे, नवनाथ मोरे, अब्दुल रज्जाक मुलानी, सुनंदा येलपले व इंदुबाई लिगाडे हे नूतन संचालक उपस्थित होते.
निवडणूक कोणतीही असो अजनाळे आणि लिगाडेवाडी हा भाग राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्विवाद बालेकिल्ला समजला जातो. येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मडळींनी सहकारी संस्थेच्या निवडणुकीतही हीच परंपरा कायम ठेवली आहे. दोन्ही सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व राखल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. पक्षाची विजयी वाटचाल अशीच कायम ठेवून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असेही शेवटी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते मोहन येलपले अशोक विटेकर महादेव लाडे ॲड. राहुल शिंदे रघुनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.


0 Comments