google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बॉडीबिल्डर संकेत काळे उद्या आकाशवाणीवर सकाळी साडेनऊ वाजता मुलाखतीचे प्रसारण

Breaking News

बॉडीबिल्डर संकेत काळे उद्या आकाशवाणीवर सकाळी साडेनऊ वाजता मुलाखतीचे प्रसारण

 बॉडीबिल्डर संकेत काळे उद्या आकाशवाणीवर

सकाळी साडेनऊ वाजता मुलाखतीचे प्रसारण

सांगोला (प्रतिनिधी): बॉडी बिल्डिंगमध्ये मिस्टर युनिव्हर्सल ठरलेला सांगोला तालुक्यातील डोंगरगावचा सुपूत्र संकेत संजय काळे याने सांगोला तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत सोलापूर आकाशवाणीने त्याची प्रकट मुलाखत घेतली आहे. त्याचे प्रसारण शुक्रवार, 6 मे रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांने तर दुसऱ्यांदा त्याचेच पुन: प्रसारण रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी करण्यात येणार आहे.याबाबतची प्रसारणाची जाहिरात आकाशवाणीने प्रसिद्ध केली आहे.


संकेत काळे याच्या कामगिरीची दखल घेत सोलापूर आकाशवाणीने त्याला स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते. संकेत काळे यांचे वडील संजय काळे गुरुजी यांच्या उपस्थित अभिराम सराफ यांनी प्रकट मुलाखत घेतली.


आकाशवाणीच्या एफएम बँड 103.4 या सोलापूर केंद्रावरून ही मुलाखत ऐकता येईल. शिवाय प्रसार भारतीच्या News On Air या मोबाईल अॅपवरही मुलाखत ऐकता येईल. हे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments