कुंभारी ते हिवरे डोरली रस्त्यावर संरक्षक लोखंडी गार्ड व दिशादर्शक फलक आवश्यक बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत तालुका अध्यक्ष श्री रावसाहेब राजाराम हेगडे
हिवरे गावापासून एक किलोमीटर अंतरावर नागमोडी वळण व रस्त्याच्या दुतर्फा विहिरी असल्याने, संरक्षक भिंत ,लहान एक फुट दगड आहेत पण तिथे संरक्षक लोखंडी गार्ड तसेच दिशादर्शक फलक आवश्यक आहेत .सन २०१७ मधे याच विहीरी मधे मोटार सायकल पडुन झालेल्या अपघातात एक महिला खुब्यातुंन पाय निकामी झाल्याने उपचार साठी दाखल केले असता, त्यांना जिव गमवावा लागला तर मोटरसायकल स्वार यांना कंबरेचा त्रास सहन करावा लागत आहे.
घटना होऊन चार वर्षे पूर्ण झाली, तरीही संबंधित विभागाकडुन कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. गावस्थीत नागरिकांना कल्पना असल्याने अपघात टळतो पण परगावचे प्रवासी कल्पनेअभावी अपघाताचे शिकारी होऊ शकतात. कुंभारी ते हिवरे डोरली रस्त्यावर दिशादर्शक फलक गायब आहेत, त्यामुळे रस्त्यावर अडणीच्या ठिकाणी योग्य असे दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहेत


0 Comments