माझी राशी शिवसेना ; शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि बळ देणार : आम. शहाजीबापू पाटील
शिवसंपर्क अभियान व शिवसैनिकांचा मेळावा संपन्न
सांगोला : सांगोला तालुक्याच्या विकास कामासाठी मुख्यमंत्र्यांना 163 पत्र पाठवली सर्वच्या सर्व पत्राला भरभरून प्रतिसाद दिला. या पुढीही अडीच वर्षाच्या कालावधी शिल्लक आहे. येत्या काळात तालुक्यात विकासकामांचा पाऊस पाडू , यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडणार नाही असे अभिवचन देत, यापूर्वी सांगोला तालुक्याच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करताना पिशवी घेऊन जात होतो, आता पोते घेऊन जाऊ आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करू असा विश्वास देत, आमदार म्हणजे जनतेचे सेवक आहोत, आमदारकी वर मला गर्व नाही परंतु माझी राशी शिवसेना आहे,
शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि बळ देणार असल्याचे आम. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
शिवसंपर्क अभियान व शिवसैनिकांचा मेळावा काल रविवार दि. 29 रोजी पु. रा. अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये पार पडला. यावेळी आम. शहाजीबापू पाटील बोलत होते. या मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिका नगरसेवक अनिल कोकीळ, जिल्हा प्रमुख संभाजीराव शिंदे, शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर, शिवसेना जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत,
शिवसेना युवा नेते सागर पाटील, युवक नेते दिग्विजय पाटील, प्रा. संजय देशमुख सर, शिवसेना तालुका प्रमुख सूर्यकांतनाना घाडगे, उपप्रमुख दत्ताभाऊ सावंत, शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब, गुंडादादा खटकाळे, मा. नगरसेवक अरुण बिले, आनंदकाका घोंगडे, सोमेश यावलकर, अरविंद पाटील, सामीर पाटील, युवासेना जिल्हा युवा अधिकारी, माढा मतदार संघाचे निरिक्षक राजेकुमार शिंदे, स्वप्निलभैया वाघमारे, उपजिल्हा प्रमुख तुकाराम भोजणे, युवसेना नेते शंकर मेटकरी, मा. प. स. सदस्य सुभाषभाऊ इंगवले, शिवसेना वाढेगाव गटाचे नेते जगदीश पाटील, भारत इंगोले, शिवसेना कट्टर कार्यकर्ते नवल गाडे, संजय मेटकरी, असलम मुलाणी, तुषार इंगळे, अमर साळुंखे, सांगोला तालुका महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई सरगर, राणीताई चव्हाण, उप तालुका महिला संघटीका सोनाली पाटील, यांच्यासह सांगोला शहर व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान पुढे बोलताना आम. शहाजीबापू पाटील म्हणाले, माझा जीवाभावाचे बंधू नाना यांच्या निधनामुळे नियोजन विस्कळीत झाले आहे. यामुळे शिवसैनिकांत पर्यंत पोहोचता आले नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत, येत्या जून महिन्यापासून आमदार तुमच्या दारी या अभियानास सुरुवात करणार आहे.
यामध्ये प्रत्येक शिवसैनिकांना प्रोत्साहन आणि उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणर आहे. दरम्यान शासनाच्या सर्व योजना प्रत्येक खेडू- पाड्यांमध्ये देखील पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तत्पूर्वी शिवसेना कार्यालय सुरू केल्यापासून ऑफिसमध्ये आलेल्या कोणत्याही नागरिकाचे काम झाली नाही असा माणूस तालुक्यात नाही. त्यामुळे ताठ मानेने सांगा मी शिवसैनिक आहे. आणि त्या शिवसेनेचे आपण मावळे आहोत, मावळा कधी हरला नाही आणि हारणार ही नाही. असे सांगत,
आमदार म्हणजे जनतेचा सेवक आहे मला आमदारकी वर गर्व नाही. तालुक्याच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी माझा लढा सुरू आहे.1999 च्या पराभवानंतर 20 वर्षाचा संघर्ष आहे. त्यामुळे तालुक्यातील कोणतेच गाव रस्ता पाणी आणी विकास या पासून वंचित राहणार नाही. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यादृष्टीने सांगोला तालुक्यात सर्वाधिक निधी येत आहे. आणि हा निधी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिला असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांनी, माढा लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांना आलेले मरगळ दूर झाली आहे. शिवसेनेमध्ये सध्या नवचैतन्य निर्माण झाले आहे. याचे समाधान आहे. येत्या काळात सबंध माढा मतदारसंघात मध्ये आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे भगवे वादळ दिसून येईल असा विश्वास व्यक्त करीत, सोलापूर जिल्ह्यातील 11 आमदारांपैकी शिवसेनेचे आम. शहाजीबापू पाटील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे माझ्या कोणत्याही शिवसैनिकाला त्रास झाला नाही पाहिजे. त्यांच्या समस्या अडचणी व मागण्या सोडविण्यासाठी बापू तुम्ही पुढाकार घ्यावा.
असे आव्हान करीत तळा गळातील शिवसैनिकां पर्यंत महाराष्ट्रातील सर्व योजना पोहचण्यासाठी व प्रत्येक शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना संपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिला जाणार आहे. या मधून निश्चितपणे शिवसैनिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे संयमी नेतृत्व म्हणून काम करत असताना त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. म्हणून विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यांना कावीळ झाली आहे.
मधूनच बंटी और बबली आणि मधेच भोंगे येत असतात, हे बाजूला सारून सक्षम पणे राज्यकारभार केला जात आहे. हे विरोधकांना पचनी पडत नाही असा विरोधकांवर निशाणा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांनी साधला. तर जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत यांनी कै. अरुणभाऊ रुपनर तालुकाप्रमुख व मी जिल्हाप्रमुख असताना सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल उभा केला होता.
तेव्हापासून शिवसेनेची सांगोला तालुक्यांमध्ये उभारणी झाली. या आठवणींना उजाळा देत, शिवसेना एक मोठे कुटुंब आहे. महा विकास आघाडीचे सर्व पक्ष पक्षबांधणी करीत आहेत. त्यांच्या तुलनेत आपला पक्ष मागे राहता कामा नये, म्हणून अभियान सुरू केले असून गावागावात शिवसेना पक्ष व कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले की, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात मोठा निधी सांगोला तालुक्याला मिळाला असून, वरिष्ठ पातळीवर शिवसेनेची सत्ता असल्यामुळे व आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे निधी खेचून आणण्याची कला असल्यामुळे या सर्व गोष्टी शक्य झाल्या. गावा गावात विकासकामांचा डोंगर उभा राहत आहे.
येत्या काळात शिवसेनेला अधिक बळकट बनवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितपणे सर्वांना सोबत घेऊन काम करू असा विश्वास त्यांनी दिला. तर पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराव शिंदे यांनी, लोक कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भगवा भगवा फडकवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे. शिवसेना तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे असा विश्वास त्यांनी दिला.
या शिवसेना संपर्क मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. संजय देशमुख सर, प्रास्ताविक सूर्यकांतनाना घाडगे तर आभार महावीर अण्णा देशमुख यांनी मांनले.


0 Comments