नवीन विश्रामगृह इमारतीच्या भूमिपूजनासह विविध कामांचे भूमिपूजन व उदघाट्न संपन्न
सांगोला /प्रतिनिधी. शनिवार दिनांक 28 मे रोजी सांगोला तालुक्यातील महुद बुद्रुक महिम व सांगोला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार शहाजीबापू पाटील दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले मागील शंभर वर्षापूर्वी बांधलेले जुनी विश्रामगृहाची इमारत जुनी झाली असल्याने या ठिकाणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी विश्रामगृह इमारतीसाठी रु दोन कोटी 20 लाख रूपये मंजूर करून आणले आहेत या कामाचे ही भूमीपूजन करून कामाला सुरवात करण्यात आली आहे
विश्रामगृहाच्या इमारतीमुळे सांगोला येथे आले अधिकाऱ्यांची,राजकीय नेत्यांची निवासाची व्यवस्था होणार असून सांगोला शहराच्या वैभवात भर पडणार आहे सुसज्ज असी इमारत उभी रहाणार आहे सांगोला शहरातून लक्ष्मी दहिवडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कोपटेवस्ती जवळ माणनदीवर रु ६कोटी ८८लाख रुपये खर्चून बांधलेल्या मोठया पुलाचे उदघाट्न लोकार्पण करण्यात आले यामुळे सांगोला इमडेवाडी लक्ष्मीदहिवडी रस्त्यावर अनेक वर्षापासून मागणी असणाऱ्या पुलाचे काम झाल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर झाले आहे काम झाले असल्याने नागरिकांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महुद येथे रु ३कोटी २०लाख खर्चून भाळवणी महिम महुद रस्त्यावर कासाळू ओढ्यावर बांधलेल्या मोठ्या पुलाचे उदघाट्न करण्यात आले महूद गार्डी रस्त्यावर रु ४० लाख रुपये खर्चून बांधलेल्या पुलाचे उदघाट्न करण्यात आले आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फंडातून मंजूर असणाऱ्या महुद येथील बाळूमामा मंदिर सभामंडप , मरीआई मंदिरासमोर सभामंडप, रामोशी वस्ती रामोशी समाजासाठी खंडोबा मंदिरासमोर सभामंडप, मुस्लिम दफनभूमी येथे संरक्षक भिंत बांधणे कब्रस्तान दुरुस्ती, कब्रस्तान हॉल अंतर्गत रस्ता, रुद्र पशुपती कोळेकर महाराज मठाजवळ सभामंडप, लिंगायत स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत बांधणे, टिंगरे वस्ती येथे दत्त मंदिरासमोर सभामंडप, मराठी फटा खांडेकर वस्ती येथे सभामंडप अश्या १कोटी ५लाख खर्चून बांधण्यात येणाऱ्या कामांचे भूमिपूजन करण्यात आली, महिम येथील भाळवणी महिम महुद रस्तावर कासाळ ओढ्यावर ३कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे, ५७लाख रुपये मंजूर असणाऱ्या महिम गार्डी रस्त्याचे, २८लाख मंजूर असलेल्या महिम कोळेगाव रस्त्याचे,५७ लाख मंजूर असणाऱ्या महिम तांदूळवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की सांगोला तालुक्यातील विकासाच्या कामासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन एकत्र येऊन काम केल तरच गावाचा विकास होणार आहे मी आमदार नसून मी जनतेचा सेवक आहे मी विजयाच्या पहिल्या भाषणामध्ये सांगितल्यापासून आजपर्यंत फक्त तालुक्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे विविध विकास कामांच्याकरिता भरघोस निधी आणला असून या पुढे महाविकास आघाडी सरकारकडून भरीव निधी आणणार.. आहे.
या कार्यक्रम साठी माजी आमदार दीपकआबा साळूंखे पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, तानाजीकाका पाटील, सूर्यकांत घाडगे, मधुकर बनसोडे, सुनिल भोरे आनंद घोंगडे,कमृद्दिन खतीब, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्री मुलगीर, यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते..



0 Comments